दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : जे.एन्.पी.ए. ते सागरी मार्ग प्रवास २५ मिनिटांत !; भटक्या श्वानांच्या नसबंदीची मागणी !…

जे.एन्.पी.ए. बंदर ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया हा प्रवास साधारण १ घंट्याचा आहे. हा प्रवास २५ मिनिटांत वातानुकूलित ‘ई-स्पीड’ बोटमधून फेब्रुवारीपासून करता येणार आहे. या प्रवासासाठी जादाचे दर आकारले जातील. त्यामुळे लाकडी प्रवासी बोटी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे येथे साहाय्यक पोलीस निरीक्षकास लाच देणार्‍या हसन अलीला अटक !

गुन्ह्यामध्ये साहाय्य करावे; म्हणून साहाय्यक पोलीस निरीक्षकाला २ सहस्र रुपयांची लाच देणार्‍या हसन अली गुलाब बारटक्के याला रंगेहात अटक केली आहे. ताडीवाला रस्ता पोलीस चौकीमध्ये २६ डिसेंबर या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य आणि पराक्रम यांना साजेसे स्मारक साकारू ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची बलीदान भूमी असलेल्या श्रीक्षेत्र वढू-तुळापूर येथे छत्रपतींचे ऐतिहासिक संदर्भ, प्राचीन वास्तूरचना आणि आधुनिक तंत्रज्ञानाची योग्य सांगड घालू. राजाचे शौर्य आणि पराक्रम यांना साजेसे जागतिक दर्जाचे स्मारक साकारू, तसेच कामाच्या प्रस्तावास बैठक घेऊन त्वरित मान्यता देऊ.

पुणे महापालिकेचे विभाजन हा प्राधान्याचा विषय ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री

१ ते १५ जानेवारीपर्यंत सरकार नियमित कामाला लागेल. पुणे महापालिकेचे विभाजन हाच प्राधान्याचा विषय असेल, असे सुतोवाच उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ‘अडीच वर्षे रखडलेल्या महापालिका निवडणुका जाहीर …

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा १११ वा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला !

माण तालुक्यातील समस्त श्रीरामभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र गोंदवले बुद्रुक येथे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा १११ वा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

३१ डिसेंबरला गडांवर धुडगूस न घालता आपापल्या घरी मेजवानी करा ! – भाजपचे आमदार अमित गोरखे यांची तरुण-तरुणींना चेतावणी

३१ डिसेंबरच्या रात्री गड-दुर्गांवर हुल्लडबाजी केली जाते. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही चेतावणी दिली.

‘सेक्युलर’चा अर्थ ‘धर्मनिरपेक्ष’ नसून सर्वधर्मसमभाव आहे ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

शब्दकोषामध्येही हाच अर्थ आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेले हे सूत्र हाच खर्‍या अर्थाने ‘सेक्युलर’ शब्दाचा अर्थ आहे.’’

गुरु गोविंद सिंह आणि त्यांच्या कुटुंबाचा त्याग अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘वीर बाल दिवसा’चे औचित्य साधून गोरेगाव येथील गुरुद्वारामध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

जीवन आनंदी करण्यासाठी अध्यात्म अपरिहार्य ! – सौ. भक्ती डाफळे

मिलिटरी अपशिंगे या गावात ‘श्री भैरवनाथ देवस्थान मंदिर ट्रस्ट’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रवचनामध्ये त्या बोलत होत्या. याचा लाभ मिलिटरी अपशिंगे आणि पंचक्रोशीतील १०० हून भाविकांनी घेतला.

राज्यातील सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांत साजरा होणार ‘संविधानदिन’ !

शासनाने घोषित केलेल्या दिनविशेषांमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनासह ४५ दिनविशेषांचा समावेश आहे.