राज्य सरकारच्या वतीने विशेष सरकारी अधिवक्ता म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती !

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्य सरकारच्या वतीने विशेष सरकारी अधिवक्ता म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे हत्या प्रकरण योग्य प्रकारे हाताळण्यासाठी राज्य सरकारने विशेष सरकारी अधिवक्त्याची नेमणूक केली आहे.

रायगड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसाठी शिवसेना आग्रही !

मुंबई येथे आल्यानंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन दर्शन घेतले. माझ्यासह आमचे कार्यकर्तेही उत्साहात आहेत. मला मंत्रीपद मिळाल्याने मी समाधानी आहे.

चुकीच्या समजुतीमुळे धर्माच्या नावाखाली अत्याचार झाले ! – सरसंघचालक प.पू. डॉ. मोहन भागवत

धर्म हा समजावून सांगावा लागतो. जर तो नीट समजला नाही, तर त्या धर्माच्या अर्धवट ज्ञानाने अधर्म होतो. जगामध्ये धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले आहेत, ते याच चुकीच्या समजुतीमुळे झाले आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प.पू. डॉ. मोहन भागवत यांनी केले.