तळमळीने प्रचारसेवा करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी भाव असलेले पावस (रत्नागिरी) येथील आधुनिक वैद्य (कै.) सदानंद देसाई (वय ७२ वर्षे) !

ते स्वामी स्वरूपानंदांचे अनुग्रहीत होते, तरी त्यांची पू. गुरुदेवांवर अतिशय श्रद्धा होती. परम पूज्यांविषयी बोलतांना त्यांची भावजागृती होत असे. त्यांनी ‘गुरुकृपायोगा’नुसार झोकून देऊन साधना केली.

‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ या प्रक्रियेच्या वेळी सनातनच्या आश्रमातील सौ. सुप्रिया माथूर यांच्याकडून श्रीमती अश्विनी प्रभु यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) या पूर्णवेळ साधना करणार्‍यांची प्रक्रिया घेतात. या प्रक्रियेच्या वेळी श्रीमती अश्विनी प्रभु आणि अन्य साधक यांना सौ. सुप्रिया माथूर यांनी त्यांना त्यांच्याकडून झालेल्या चुका अन् मनाची प्रक्रिया यांचे प्रसंग सांगितल्यावर दिलेले दृष्टीकोन इथे दिले आहेत.