‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ या प्रक्रियेच्या वेळी सनातनच्या आश्रमातील सौ. सुप्रिया माथूर यांच्याकडून श्रीमती अश्विनी प्रभु यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

वर्ष २०१९ मध्ये श्रीमती अश्विनी प्रभु (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) या स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन या प्रक्रियेसाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) या पूर्णवेळ साधना करणार्‍यांची प्रक्रिया घेतात. या प्रक्रियेच्या वेळी सौ. सुप्रिया माथूर यांनी त्यांना पुढील दृष्टीकोन दिले. १२ फेब्रुवारी या दिवशी या सूत्रांचा काही भाग आपण पाहिला. आज पुढील भाग पाहूया. (भाग ५)

भाग ४ पाहण्या करिता येथे क्लिक करा https://sanatanprabhat.org/marathi/763934.html

सौ. सुप्रिया माथूर

१३. प्रसंग – समर्पितभाव

१३ अ. दृष्टीकोन

१. देवाच्या इच्छेने मला सेवा मिळाली आहे.

२. जी सेवा मिळाली, ती ईश्वराला अपेक्षित आहे.

३. सेवेतून ईश्वर आपला उद्धारच करत असतो.

४. शरणागती असल्यास साधनेच्या प्रयत्नांत ईश्वराचे चैतन्य येऊन मनाची अंतर्मुखता वाढते.

श्रीमती अश्विनी प्रभु

५. साधना म्हणजे सातत्य. साधनेतील चूक म्हणजे भाव अल्प आणि ईश्वराचे अनुसंधान नव्हते, असा अर्थ होतो.

६. अखेरच्या श्वासापर्यंत गुरुचरणी अर्पण होण्याचा विचार करायचा आणि प्रयत्न करत रहायचे.

७. तत्त्वनिष्ठेने प्रयत्न केल्यास समष्टीत फलनिष्पत्ती प्राप्त होते.

८. कृतज्ञताभाव आणि शरणागती वाढल्यावर ईश्वराचे चैतन्य प्राप्त होऊन पुढील प्रक्रिया होते.

९. ईश्वरामुळेच सर्व होत असते. ते पहावे आणि अनुभवावे. केवळ देहाने सेवा केल्यास तो समर्पितभाव होणार नाही.

१०. ‘मी काय केले यापेक्षा ईश्वराने माझ्यासाठी काय काय केले ? मला काय काय शिकवले’, याची जाणीव ठेवल्यास सतत कृतज्ञताभावात राहू शकतो.

११. सतत सेवकाच्या भूमिकेत राहिले पाहिजे.

१२. ईश्वर सूक्ष्म आहे. त्याची कार्यरत शक्ती आपल्यासाठी काय काय करते ? याकडे सतत लक्ष देऊन शरणागती वाढवली पाहिजे.

१३. ज्याच्यात जेवढी भक्ती आहे, त्यानुसार ईश्वराचे साहाय्य मिळत रहाते.

१४. ‘अहं नष्ट होण्यासाठी ईश्वर प्रसंग घडवतो, यापेक्षा गुण निर्माण होण्यासाठी प्रसंग घडवतो’, हा विचार अधिक योग्य आहे.

१५. ईश्वराशी अनुसंधान वाढल्यावर उत्साह, चैतन्य वाढते आणि त्यामुळे तत्परता येते.

१६. उत्साह वाढवण्यासाठी दिवसातून ५ वेळा आत्मनिवेदन करावे. प्रत्येक कृतीला भावाची जोड द्यावी.

१७. सेवेमुळे अनुभूती येते, त्यासह ईश्वराचे गुण आणि चैतन्य मिळवण्यासाठी प्रयत्न करावे.

१८. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया म्हणजे सर्व देहांची शुद्धी.

१९. शिकण्याच्या स्थितीत रहाण्यासाठी न्यूनतम १०० वेळा प्रार्थना करावी.

२०. सहसाधक म्हणजे गुरुदेवांनी आपली समष्टी साधना होण्यासाठी दिलेले साहाय्य आहे. त्यासाठी त्याविषयी शुद्ध भाव असावा.

२१. मनाची अडचण असल्यास समर्पण होणे कठीण. सेवेत मन शुद्ध असले पाहिजे. मनाने पूर्णवेळ आहाेत का ?

२२. शरिरासह मनसुद्धा ईश्वराला अपेक्षित असे शुद्ध आहे का ?

२३. गुरुकार्य करून आपला उद्धार करून घेतला पाहिजे.’ (क्रमशः)

– श्रीमती अश्विनी प्रभु, मंगळुरू

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक