महर्षि, संत आणि नाडीवाचक यांनी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या अवतारी कार्याची करून दिलेली ओळख अन् सर्व समष्‍टी ठायी कार्यरत असलेले त्‍यांचे तत्त्व !

परात्‍पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हेच श्रीहरि विष्‍णूचे कलियुगातील समष्‍टीची बुद्धी शुद्ध करणारा अवतार होत !

‘गुरूंच्‍या संकल्‍पाने शिष्‍याची आध्‍यात्मिक प्रगती होणे’, हीच गुरुकृपा !

गुरुगीतेत स्‍पष्‍ट केले आहे, ‘श्री गुरु हेच अज्ञान नाहीसे करणारे ‘ब्रह्म’ आहेत.’ गुरूंच्‍या मार्गदर्शनानुसार जो भक्‍त, साधक अथवा शिष्‍य आचरण करील, त्‍याची साधना श्री गुरुच करवून घेतात. गुरु त्‍याला अनुभूती आणि प्रत्‍यक्ष स्‍वरूपात ज्ञान देऊन त्‍याचे अज्ञान दूर करतात.

दासबोधातील सद़्‍गुरुस्‍तवन आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्‍यातून उलगडलेले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्‍व !

आपल्‍या कृपास्‍पर्शाने साधकांना आत्‍मज्ञान करून देणारे आणि अवघ्‍या विश्‍वाला व्‍यापणारे ब्रह्मांडगुरु सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव !

हिंदूंनो, प्रत्‍येक क्षेत्रात धर्मसंस्‍थापना होण्‍यासाठी गुरुसेवा म्‍हणून क्षमतेनुसार कार्य करा !

धर्मसंस्‍थापना म्‍हणजे केवळ धर्मनिरपेक्ष राष्‍ट्राला ‘हिंदु राष्‍ट्र’ घोषित करणे नव्‍हे, तर धर्मग्‍लानी आलेल्‍या राष्‍ट्रातील आणि समाजातील प्रत्‍येक घटकाला धर्ममय बनवणे होय. त्‍यामुळे हिंदूंनो, या गुरुपौर्णिमेपासून गुरुसेवा म्‍हणून प्रत्‍येक क्षेत्रात धर्मसंस्‍थापना होण्‍यासाठी क्षमतेनुसार कार्य करण्‍याचा संकल्‍प करा !

‘भक्‍तवात्‍सल्‍य’ हा आश्रम सुंदर भक्‍तीसुखे भरला ।

‘भक्‍तवात्‍सल्‍य’ हा आश्रम सुंदर भक्‍तीसुखे भरला ।
भक्‍तजनांच्‍या कल्‍याणास्‍तव रात्रंदिन झटला ॥

श्री गुरूंच्‍या ऐतिहासिक धर्मसंस्‍थापनेच्‍या कार्यात दायित्‍व घेऊन सेवा करा !

आता हिंदु राष्‍ट्र स्‍थापन होण्‍याचा काळ जवळ आला आहे; पण भविष्‍यात संपूर्ण राष्‍ट्ररचना अध्‍यात्‍मावर आधारित होण्‍यासाठी आजपासून कृती करणे, हे धर्मसंस्‍थापनेचे कार्य आहे. श्री गुरूंच्‍या या ऐतिहासिक धर्मसंस्‍थापनेच्‍या कार्यात दायित्‍व घेऊन सेवा करा !

श्री गुरूंच्‍या अवतारी कार्यात उत्तम ‘समष्‍टी शिष्‍य’ बनून सहभागी व्‍हा !

‘गुरूंच्‍या मार्गदर्शनाखाली साधना करून मोक्षप्राप्‍ती केल्‍यानेच गुरुऋण फेडता येते’, असे गुरुगीतेमध्‍ये सांगितले आहे.

गुरुप्राप्‍तीची खूण

‘ज्‍या वेळी गुरुशक्‍तीचा आपल्‍या अंतर्यामी प्रवेश झाल्‍याचा तुम्‍हाला अनुभव येईल, त्‍या वेळी तुम्‍हाला आपल्‍या गुरूंची ओळख पटेल. गुरु प्राप्‍त झाल्‍याची ती खूण आहे.’

वर्तमानकाळातील सर्वश्रेष्‍ठ समष्‍टी साधनेचा लाभ घ्‍या ! – सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्‍ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आता भारताला धर्माधिष्‍ठित राष्‍ट्र घोषित करण्‍यासाठी, म्‍हणजेच भारतात रामराज्‍य स्‍थापनेसाठी प्रयत्न करणे, हीच वर्तमानकाळातील सर्वश्रेष्‍ठ समष्‍टी साधना आहे. या संधीचा सर्वांनी लाभ घ्‍यावा !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यासम त्‍यांच्‍या आध्‍यात्मिक उत्तराधिकारी, जशा वेदांसम श्रुति-स्‍मृति !

वर्ष २०२२ मधील दत्तजयंतीच्‍या दिवशी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना आध्‍यात्मिक उत्तराधिकारपत्र दिले.