‘माणूस’ कुणाला म्हणता येईल ?
‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वैराचार हे एक वेळ प्राण्यांचे वैशिष्ट्य असू शकते, माणसाचे नव्हे. ‘धर्मबंधनात रहाणे, धर्मशास्त्रांचे अनुकरण करणे’, असे करणार्यांनाच ‘माणूस’ म्हणता येते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वैराचार हे एक वेळ प्राण्यांचे वैशिष्ट्य असू शकते, माणसाचे नव्हे. ‘धर्मबंधनात रहाणे, धर्मशास्त्रांचे अनुकरण करणे’, असे करणार्यांनाच ‘माणूस’ म्हणता येते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
जिव्हा आणि उपस्थ या दोन इंद्रियांचा कांंहीतरी विलक्षण प्रेमसंबंध आतून आहे. विष पिऊनही सुखाने असणारे ‘शंकर’ कुणी असतील, तर असोत. नियमाला अपवाद असतो, तरी पण प्राय: (प्रथमतः) असेच दिसून येते. निःस्पृहाने जिभलीचे (जिभेचे) चोचले पुरवत बसू नये.’
‘ज्या ऋषिमुनींना ईश्वराचा शोध लावता आला, त्यांच्यासाठी हल्लीचे वैज्ञानिक, शास्त्रज्ञ जे शोध लावतात, ते पोरखेळासारखे आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘देश, काल आणि पात्र पाहून, तसेच सत्कारपूर्वक, शुद्ध बुद्धीपुरस्सर अन् प्रतिफळाची आशा न धरता दिलेले दानच खरे दान आणि तेच गृहस्थाचे मोठे तप होय.’
‘पाश्चात्त्य संस्कृती शरीर, मन आणि बुद्धी यांना सुख देण्यासाठी धडपडते, तर हिंदु संस्कृती ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘आनंद स्वरूपाची अभिलाषा हेच भक्ती-ज्ञान आणि वैराग्य होय. यालाच ‘ध्यानयोग’ म्हणतात. ही आनंद स्वरूपाची एकमेव अनुभूतीच असावी. आनंद अनुभवाविना कोणत्याही वृत्तीचा उद्गम होऊ न देणे, हेच आत्मानात्मविवेकाचे कार्य आहे.
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना जिज्ञासा नसल्याने ते स्वतःला आहे तेवढ्या छोट्याशा ज्ञानात (अज्ञानात) रहातात. त्यांना पुढचे पुढचे काहीच कळत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘पूर्वी लोकांना वाटायचे, ‘हिंदु राष्ट्र’ हे स्वप्न आहे. ‘हिंदु राष्ट्र’ कधीही स्थापन होणार नाही’; परंतु आता पुष्कळ लोकांना वाटते, ‘हिंदु राष्ट्राची स्थापना निश्चितच होईल.’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
शहामृगाला जेव्हा कळते की, आता संकट येणार आहे, तेव्हा ते वाळूत डोके खुपसून बसते. त्याला वाटते की, संकट निघून जाईल; पण तसे न होता ते संकट त्याचाच नाश करते. आपल्या सर्वांची स्थिती तशी होऊ नये, यासाठी आता साधना करण्याविना पर्याय नाही !
‘आपण देवाचे भक्त बनलो की, देव आपत्काळातही आपल्या तोंडात सोन्याचा चमचा ठेवतो, म्हणजेच तो आपल्याला आपत्काळाची झळ लागू देत नाही !’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ