‘लँड जिहाद’चा काळा कायदा रहित करण्‍यासाठी हिंदूंनी संघटितपणे आवाज उठवावा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

म्‍हैसाळ (सांगली) येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेत ३ सहस्रांपेक्षा अधिक हिंदूंचा हिंदु राष्‍ट्राचा उद़्‍घोष !

छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख ‘धर्मवीर’ म्‍हणूनच ! – आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजप

हिंदु धर्म रक्षणासाठी आम्‍हाला रस्‍त्‍यावर उतरावे लागले, तरी चालेल; पण देव, देश आणि धर्म यांविषयी आम्‍ही कोणतीही तडजोड करणार नाही.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधीमंडळाच्‍या मध्‍यवर्ती सभागृहात स्‍थापन !

गळ्‍यात रुद्राक्षांची माळ आणि खांद्यावर भगवी शाल असलेले बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र हे चित्रकार किशोर मानावडेकर यांनी साकारलेले आहे.

मौलाना, पाद्री आणि भंते यांच्‍याकडून चमत्‍कार सिद्ध करून दाखवल्‍यास ५१ लाखांचे पारितोषिक देऊ ! – महंत अनिकेतशास्‍त्री जोशी

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा उद्देश भरकटला आहे. फक्‍त आणि फक्‍त हिंदु धर्मगुरूंना लक्ष्य केले जात आहे. त्‍यामुळे हा कायदा महाराष्‍ट्रातून लवकरात लवकर रहित करावा.

कुलगुरु आणि संशोधक यांना जेवणासाठी १ घंटा ताटकळत रहावे लागले !

मान्‍यवर येणार असतांनाही त्‍यांचे सुनियोजन न करता सावळा-गोंधळ चालू देणे लज्‍जास्‍पद !

त्र्यंबकेश्‍वर (जिल्‍हा नाशिक) येथील संतश्रेष्‍ठ निवृत्तीनाथ यात्रेत ५० सहस्र वारकर्‍यांना महाप्रसाद !

श्री गजानन महाराज संस्‍थानच्‍या त्र्यंबकेश्‍वर शाखेने ३ दिवस १२-१२ घंटे वारकरी आणि भक्‍त यांच्‍यासाठी विनामूल्‍य महाप्रसाद देण्‍याची व्‍यवस्‍था केली होती.

आज विटा (जिल्‍हा सांगली) येथे भव्‍य ‘हिंदु गर्जना मोर्चा’ !

खानापूर तालुक्‍यातील सकल हिंदु समाजाच्‍या वतीने २४ जानेवारीला सकाळी १० वाजता भव्‍य ‘हिंदु गर्जना मोर्चा’चे आयोजन करण्‍यात आले आहे. ‘लव्‍ह जिहाद’, धर्मांतर, गोहत्‍या यांच्‍या विरोधात कठोर कायदे व्‍हावेत, मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवावेत, या प्रमुख मागण्‍यांसाठी हा मोर्चा काढण्‍यात येणार आहे.

अनिल देशमुख यांच्‍या जामिनाच्‍या स्‍थगितीची याचिका सर्वोच्‍च न्‍यायालयाने फेटाळली !

महाराष्‍ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्‍या जामिनाला स्‍थगिती द्यावी, यासाठी केंद्रीय अन्‍वेषण यंत्रणेने केलेली याचिका २३ जानेवारी या दिवशी सर्वोच्‍च न्‍यायालयाने फेटाळून लावली. देशमुख यांना मुंबई उच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या जामिनाला स्‍थगिती मिळावी, यासाठी केंद्रीय अन्‍वेषण यंत्रणेने सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका केली होती.

हिंदु संस्‍कृतीच्‍या रक्षणासाठी देवस्‍थानाचा विकास आवश्‍यक ! – सुरेश चव्‍हाणके, ‘सुदर्शन न्‍यूज’ वृत्तवाहिनी

प्रत्‍येक देवस्‍थान हे हिंदु संस्‍कृतीचे प्रेरणास्‍थान असल्‍यामुळे त्‍यांचा विकास झाला पाहिजे. हिंदु संस्‍कृतीच्‍या रक्षणासाठी त्‍याची आवश्‍यकता आहे. देवस्‍थानांच्‍या माध्‍यमातून धार्मिकता वाढीस साहाय्‍य होते. नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेशाच्‍या दर्शनाने समाधान लाभले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संपत्तीचे जी.आय.एस्. सर्वेक्षण करून महसूल गळती रोखणार ! – मुख्यमंत्री

गोवा शासनाने अशा सविस्तर सर्वेक्षणास प्रारंभ केला आहे. या सर्वेक्षणामुळे कर व्यवस्थितपणे गोळा करता येणार आहे, तसेच अवैध बांधकामे शोधून काढता येणार आहेत.