‘लँड जिहाद’चा काळा कायदा रहित करण्‍यासाठी हिंदूंनी संघटितपणे आवाज उठवावा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

म्‍हैसाळ (सांगली) येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेत ३ सहस्रांपेक्षा अधिक हिंदूंचा हिंदु राष्‍ट्राचा उद़्‍घोष !

सभेत दीपप्रज्‍वलन करतांना श्री. मनोज खाडये(उजवीकडे) आणि सौ. भक्‍ती डाफळे (डावीकडे)

म्‍हैसाळ (सांगली) – ‘वक्‍फ कायद्याच्‍या माध्‍यमातून हिंदूंचे घर, दुकान, शेती, भूमी आणि धार्मिक स्‍थळे यांसह सरकारची संपत्तीही सहज बळकावता येते. काँग्रेस सरकारने ‘वक्‍फ बोर्ड कायद्या’त केलेल्‍या सुधारणांमुळे हिंदु, ख्रिस्‍ती, शीख, बौद्ध आणि अन्‍य गैरमुसलमानांची कोणतीही संपत्ती ही वक्‍फ बोर्डाची संपत्ती म्‍हणून घोषित करण्‍याचे अधिकार दिले आहेत. कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील गडहिंग्‍लज येथे दफनभूमीसाठी दिलेली केवळ २० गुंठ्यांची भूमी आज ४ एकर झाली आहे. पुढे जाऊन उद्या ते आणखी कशावर अधिकार सांगू शकतील, याचा विचारही करू शकत नाही. तरी ‘लँड जिहाद’चा काळा कायदा रहित करण्‍यासाठी हिंदूंनी संघटितपणे आवाज उठवायला हवा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्‍ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्‍य समन्‍वयक श्री. मनोज खाडये केले. ते २२ जानेवारीला कर्मवीर भाऊराव पाटील माध्‍यमिक आणि उच्‍च माध्‍यमिक विद्यालय येथे हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने आयोजित हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेत बोलत होते.

श्री. मनोज खाडये

या सभेसाठी ३ सहस्रांपेक्षा अधिक हिंदूंनी उपस्‍थिती दर्शवून हिंदु राष्‍ट्राचा उद़्‍घोष केला. या प्रसंगी रणरागिणी शाखेच्‍या सौ. भक्‍ती डाफळे यांनीही मार्गदर्शन केले. श्री. कुश आठवलेगुरुजी, श्री. प्रशांत जोशीगुरुजी, तसेच श्री. महेश जोशीगुरुजी यांनी वेदमंत्रपठण केले. हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्याचा आढावा हिंदु जनजागृती समितीच्‍या सौ. विद्या सादुल यांनी मांडला. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री. प्रशांत चव्‍हाण यांनी केले.

उपस्‍थित पक्ष, संघटना, संप्रदाय

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान, भाजप, शिवसेना (उद्धव ठाकरे आणि शिंदे गट), विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, वारकरी संप्रदाय, स्‍वामी समर्थभक्‍त मंडळ, म्‍हैसाळ येथील सकल जैन समाज.

म्‍हैसाळ येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेत वेदमंत्रपठण करतांना पुरोहित
म्‍हैसाळ येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेत उपस्‍थित हिंदूंनी मार्गदर्शन करतांना श्री. मनोज खाडये
म्‍हैसाळ येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेत ष.ब्र. शिवयोगी शिवाचार्य महाराज यांचा सन्‍मान करतांना श्री. रमेश लुकतुके
म्‍हैसाळ येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेनंतरच्‍या आढावा बैठकीत उपस्‍थितांशी संवाद साधतांना श्री. मनोज खाडये

उपस्‍थित मान्‍यवर

म्‍हैशाळ येथील ष.ब्र. शिवयोगी शिवाचार्य महाराज, माजी आमदार श्री. नितीन शिंदे, भाजप जिल्‍हाध्‍यक्ष श्री. दीपक (बाबा) शिंदे, म्‍हैशाळ येथील सरपंच सौ. रश्‍मी आबासाहेब शिंदे-सरकार, भाजपचे किसान मोर्चाचे श्री. आबासाहेब शिंदे-सरकार, वड्डीचे सरपंच श्री. महेंद्रसिंह शिंदे, शिवसेना (शिंदे गट) उपजिल्‍हाप्रमुख श्री. माधवराव गाडगीळ, नरवाड येथील सरपंच श्री. मारुति जमादार, विश्‍व हिंदु परिषद-बजरंग दल बेळगाव जिल्‍हा उपाध्‍यक्ष डॉ. अमोल सरडे, सकल मराठा समाजाचे श्री. संभाजी शिंदे, शिवसेनेचे श्री. पंडित (तात्‍या) कराडे, जैन समाजाचे श्री. दिलीप (बंडू) पाटील.

क्षणचित्रे

१. म्‍हैसाळ येथे ३० जानेवारीला सायंकाळी ६ वाजता ‘लव्‍ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि धर्मांतर यांच्‍या विरोधात आंदोलन घेण्‍यात येणार आहे, तरी त्‍याला बहुसंख्‍य हिंदूंनी उपस्‍थित रहाण्‍याचे आवाहन श्री. मनोज खाडये यांनी केले.

२. सभेसाठी म्‍हैसाळ परिसरातील नरवाड, बेडग, ढवळी यांसह विविध गावांतील धर्मप्रेमी उपस्‍थित होते.

हिंदूंचे राष्‍ट्रपुरुष, तसेच हिंदु धर्म यांच्‍या विरोधात बोलणार्‍यांना संविधानिक मार्गाचा अवलंब करून त्‍यांना कायमस्‍वरूपी घरी बसवा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

आपल्‍या मार्गदर्शनात श्री. मनोज खाडये पुढे म्‍हणाले, ‘‘सध्‍या महाराष्‍ट्रात सर्वत्र हिंदूंचे मोर्चे निघत आहेत. हे मोर्चे कशासाठी ? असे प्रश्‍न उपस्‍थित केले जात आहेत. ज्‍यांनी देशासाठी कारागृहवास पत्‍करला अशा स्‍वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केली जात आहे. जे टीका करत आहेत त्‍यांची टीका करण्‍याची पात्रता तरी आहे का ? हे पडताळले पाहिजे. त्‍यामुळे यापुढील काळात अशा प्रकारे हिंदूंचे राष्‍ट्रपुरुष, तसेच हिंदु धर्म यांच्‍या विरोधात बोलणार्‍यांना संविधानिक मार्गाचा अवलंब करून त्‍यांना कायमस्‍वरूपी घरी बसवा.’’