पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्‍या हद्दीतील होर्डिंगची त्‍यांच्‍याकडे नोंदच नाही !

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्‍या हद्दीत अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंगची संख्‍या मोठी आहे; मात्र पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे त्‍यांच्‍या हद्दीतील एकाही होर्डिंगची नोंद नाही.

१ मेपासून रेती आणि वाळू यांची मागणी ‘मोबाईल अ‍ॅप’द्वारे करावी लागणार !

नवीन धोरणानुसार प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षासाठी नागरिकांना प्रतिब्रास ६०० रुपये (१३३ रुपयांना १ मेट्रीक टन) वाळू विक्रीचा दर निश्‍चित करण्‍यात आला आहे.

ग्रामस्थांच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

‘ग्रामस्थांनी शांतता राखून प्रशासनाला त्यांचे काम करण्यासाठी सहकार्य करावे. या प्रकल्पाविषयी ग्रामस्थांच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल’, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.

पाकिस्‍तानातील हिंदूंवर होत असलेले अत्‍याचार रोखण्‍यासाठी सोलापूर येथे ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन’ !

श्रीरामनवमी उत्‍सवाच्‍या वेळी दंगली करणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

छत्रपती संभाजीनगर येथील दंगलीत वाहने जाळणारे धर्मांध २ मित्र अटकेत !

यात २ धर्मांध मित्र दुचाकीवरून येतांना आणि जातांना चित्रणामध्‍ये कैद झाले. अन्‍वेषणात ते जुहूर आणि इलियास असल्‍याचे निष्‍पन्‍न झाले.

श्री देव भैरीची मिरवणूक काढल्याचे प्रकरणी न्यायालयाने केली सर्वांची निर्दोष मुक्तता !

श्री देव भैरीची मिरवणूक काढल्याच्या प्रकरणी नागरिकांच्या दोषसिद्धीसाठी कोणताही सबळ, संयुक्त पुरावा न्यायालयापुढे ठेवण्यात आलेला नसल्याने सर्वांची निर्दाेष मुक्तता करण्यात आली. 

शासनाला दिलेल्या अहवालात माकडांचे निर्बिजीकरण करण्याची शिफारस

कोकणात वन्यप्राण्यांमुळे होणार्‍या हानीविषयी हानी टाळण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर माकडांचे  निर्बिजीकरण करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

आद्यशंकराचार्यांनी चारही दिशांना पीठाधिशांना नेमून अद्वैत तत्त्वज्ञानाची परंपरा अखंडपणॆ चालू ठेवली ! – प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे

आद्यशंकराचार्य यांनी केवळ ३२ वर्षांच्या आयुष्यात प्रस्थानत्रयीवर परिपूर्ण भाष्ये, अनेकविध स्तोत्ररचना, भारतभर संचार करून ४ दिशांना केलेली मठांची स्थापना, असे असाधारण कार्य केले.

महाराष्ट्रासाठी बारसू येथील तेलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

आम्हाला हा विषय प्रतिष्ठेचा करायचा नाही. आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. आंदोलकांच्या मनातील शंका दूर करण्याची आमची सिद्धता आहे. तेलशुद्धीकरण प्रकल्प कोकणातील नियोजित ठिकाणी होईल.

शासकीय शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांसह गणवेश, बूट आणि वह्या शासनाकडून मिळणार ! – शिक्षणमंत्री दीपक केसरकर

राज्यातील सर्व शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसह गणवेश, बूट आणि वह्या शासनाकडून दिल्या जाणार आहेत. इयत्ता १ ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे साहित्य दिले जाणार असून येत्या शैक्षणिक वर्षापासून यावर कार्यवाही होणार आहे.