मुख्यमंत्र्यांच्या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पुढे ढकलला !

निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान समारंभात काही श्री साधकांचे उष्माघातामुळे निधन झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

शंभुदुर्ग प्रतिष्ठानच्या चेतावणीनंतर ख्रिस्ती व्यक्तीकडून पदाचे त्यागपत्र !

धर्महानीच्या विरोधात चिकाटीने लढा देणार्‍या शंभुदुर्ग प्रतिष्ठानचा आदर्श समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी घ्यावा !

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचा कुमारी आणि सौभाग्यवती स्त्रियांनाही ‘श्रीमती’ म्हणण्याचा सल्ला!

शास्त्र, संस्कृती, परंपरा आदींमध्ये मनाने पालट करण्याऐवजी संत, धर्मशास्त्राचे अभ्यासक यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे !

नाशिक येथील सिद्धिविनायक मंदिरात गणेशमूर्तीच्या दागिने चोरणार्‍याला अटक !

मशिदी किंवा चर्च येथे कधी चोरी झाल्याचे ऐकिवात आहे का ?

लोलये (गोवा) येथील नाल्यातील पाणी जाण्याच्या पाईपमधील गाळ साचल्याची तक्रार ‘ट्विटर’द्वारे नोंदवल्यानंतर कोकण रेल्वेकडून गाळ स्वच्छ !

सध्याच्या काळात ट्विटरचा प्रभावी वापर करून स्थानिक समस्या कशा प्रकारे सोडवू शकतो ? याचे उदाहरण !

राज्यातील बसस्थानकांच्या स्वच्छतेची अधिकाऱ्यांकडून केली जाणारी पडताळणी बंदच !

यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यातील स्थापत्य अधिकारी, वाहतूक व्यवस्थापक आणि कामगार अधिकारी या अधिकाऱ्यांकडून बसस्थानकांच्या स्वच्छतेची वेळोवेळी पडताळणी करण्याची कार्यपद्धती होती. सध्या मात्र ही पडताळणी बंद आहे, अशी माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला एस्.टी. महामंडळाच्या एका अधिकाऱ्यांनी दिली.

पलूसचे (जिल्हा सांगली) साक्षात्कारी संत श्री समर्थ धोंडीराज महाराज यांच्या ११५ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !

पलूसचे साक्षात्कारी संत श्री समर्थ धोंडीराज महाराज यांची ११५ वी पुण्यतिथी असून १६ वा रथोत्सव होणार आहे. पारायण आणि पुण्यतिथी महोत्सव २१ एप्रिल ते २९ एप्रिलपर्यंत होत आहे.

बांधकाम व्यावसायिक डी.एस्. कुलकर्णी यांच्यावर सीबीआयकडून २ गुन्हे नोंद !

येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डी.एस्.के.) यांच्या विरोधात सीबीआयने दोन गुन्हे नोंद केले आहेत. त्यांच्यावर ५८० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. १ जुलै २०२० या दिवशी स्टेट बँकेने दिलेल्या पत्राच्या आधारे पहिला गुन्हा नोंद केला आहे.

सनातनचा साधक कु. अथर्व दिनकर पाटील ‘अभिरूप’ शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम !

चि. अथर्वने हे यश गुरुमाऊलींच्याच कृपेमुळे म्हणजे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याच कृपेमुळेच मिळाले आहे, असे सांगून गुरमाऊलींच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

प्रवेशद्वारावरील नाव मराठीत असण्यासाठी विश्व हिंदु परिषदेचे तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण !

येथील नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरील नाव उर्दू भाषेत लिहिलेले आहे. १० फेब्रुवारी २०२३  या दिवशी नगरपालिकेचे प्रशासक मा. उपविभागीय अधिकारी यांनी उर्दू भाषेतील ठराव रहित करून ‘मराठी भाषेतच लिखाण करावे’, असा नवीन ठराव केला होता; मात्र अजूनपर्यंत त्याची कार्यवाही झालेली नाही.