आज अन्‍यायग्रस्‍त देवस्‍थान इनाम भूमीधारकांचा छत्रपती संभाजीनगर येथे ‘आक्रोश मेळावा’ !

राज्‍यात विविध शासकांनी मोठ्या प्रमाणात पुजारी-अर्चक यांना इनाम भूमी दिल्‍या होत्‍या. साधारणतः १९७० च्‍या दशकात या सर्व भूमी अवैधरित्‍या वर्ग २ संवर्गात टाकल्‍या गेल्‍याने या भूमीत कसणार्‍या शेतकर्‍यांची मोठी कुचंबणा चालू आहे.

भूमीच्या आत दडलेले ४०० वर्षे प्राचीन शिवमंदिर खोदकामातून आले समोर ! 

बेंगळुरू शहरातील ‘मल्लेश्वरम् लेआऊट’ भागाच्या कडू मल्लेश्वर मंदिराच्या समोर हे शिवमंदिर सापडले आहे. या मंदिराला ‘नंदी तीर्थ’, ‘नंदीश्वर तीर्थ’, ‘बसव तीर्थ’ किंवा केवळ ‘मल्लेश्वरम् नंदी गुढी’ असेही म्हणतात.

सावरकर यांच्‍यासाठी ‘हिंदुत्‍व हेच राष्‍ट्रीयत्‍व’ होते ! – योगेश सोमण, ज्‍येष्‍ठ अभिनेते आणि दिग्‍दर्शक

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचा धर्माकडे बघण्‍याचा दृष्‍टीकोन हा विज्ञाननिष्‍ठ होता. स्‍वातंत्र्यवीर सावरकरांची प्रत्‍येक कृती, विचार हा राष्‍ट्राकरता होता. सावरकरांसाठी ‘हिंदुत्‍व हेच राष्‍ट्रीयत्‍व’ होते, असे मत ज्‍येष्‍ठ अभिनेते आणि दिग्‍दर्शक योगेश सोमण यांनी व्‍यक्‍त केले.

पुणे येथे ‘झिका’चा पहिला रुग्‍ण !

पुणे – शहरात झिका रोगाचा यंदा पहिला रुग्‍ण आढळला आहे. हा रुग्‍ण येरवड्यातील प्रतीकनगरमध्‍ये सापडला असून आरोग्‍य विभागाने प्रतिबंधात्‍मक उपाययोजना चालू केल्‍या आहेत. झिकाचा संसर्ग झालेली ६४ वर्षांची महिला आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्‍ये एक सांस्‍कृतिक कार्यक्रम झाला होता. त्‍याला ही  महिला उपस्‍थित होती. त्‍यानंतर तिला ताप आला आणि अंगदुखीचा त्रास होऊ लागला. त्‍यानंतर तिला पुण्‍यातील … Read more

लाच घेतांना नायब तहसीलदार कह्यात !

भूमीची अकृषक आकारणी करून गुंठेवारी नियमानुकूल आदेश देण्‍यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार सुनील चव्‍हाण यांच्‍यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत कह्यात घेतले.

पंढरपूर येथील कार्तिक यात्रेच्‍या निमित्ताने २० नोव्‍हेंबरपासून वारकर्‍यांसाठी विशेष रेल्‍वे !

पंढरपूर येथील कार्तिक यात्रेसाठी २० ते २७ नोव्‍हेंबर या कालावधीत मध्‍य रेल्‍वेकडून वारकर्‍यांसाठी विशेष रेल्‍वेगाड्या उपलब्‍ध करून देण्‍यात आल्‍या आहेत.

मराठ्यांना ‘कुणबी’ प्रमाणपत्र देण्‍याविषयी नियुक्‍त समिती राज्‍याचा दौरा करणार !

मराठ्यांना ‘कुणबी’ म्‍हणून प्रमाणपत्र देण्‍यासाठी पात्र असलेल्‍या व्‍यक्‍तींना त्‍याप्रमाणे जातीचे प्रमाणपत्र देण्‍याची कार्यपद्धत निश्‍चित करण्‍यासाठी राज्‍यशासनाकडून निवृत्त न्‍यायमूर्ती संदीप शिंदे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समितीची स्‍थापना करण्‍यात आली आहे.

वनांची औद्योगिक उपयोगिता वाढवण्‍यासाठी राज्‍यात औद्योगिक विकास महामंडळ स्‍थापन होणार !

महाराष्‍ट्रातील एकूण भूमीपैकी २० टक्‍के म्‍हणजे ६१ सहस्र ९०७ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. वनाच्‍या माध्‍यमातून उपजीविकेची साधने निर्माण होत आहेत. राज्‍यात वनांपासून विविध ३३ उत्‍पादने घेतली जात आहेत. वनांची उत्‍पादकता वाढवण्‍याच्‍या दृष्‍टीने अभ्‍यास करण्‍यासाठी शासन प्रायोगिक तत्त्वावर समिती स्‍थापन करणार आहे.

उपासमार आणि मानसिक तणाव यांमुळे देवमाशाच्या पिल्लाचा मृत्यू

देवमाशाचे पिल्लू कार्यक्षेत्राबाहेर किंवा कळपाबाहेर गेले, तर सैरभैर होतात. त्यांच्यावर मानसिक ताण येतो. कधी कधी या मानसिक ताणामुळे त्यांना हृदयविकाराचा झटकाही येतो.

Boycott Sunburn Festival : गोवा सरकारची मान्यता मिळण्यापूर्वीच सनबर्नकडून कलाकारांच्या नावांची घोषणा

‘गोवा सरकार महसुलासाठी सनबर्नला मान्यता देणारच’, याची सनबर्नच्या आयोजकांना निश्चिती आहे, असेच जनतेला वाटणार !