ठाणे येथे राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. याविरोधात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख वंदना डोंगरे यांनी तक्रार प्रविष्ट केल्यानंतर राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प.पू. भक्तराज महाराज यांचा महानिर्वाण उत्सव कांदळी (पुणे) येथे भावपूर्ण वातावरणात साजरा !

‘हरि ॐ तत्सत्’ या नामजपाच्या गजरात सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचा महानिर्वाण उत्सव कार्तिक कृष्ण पक्ष नवमी, म्हणजेच १८ नोव्हेंबर या दिवशी कांदळी, ता. जुन्नर, जिल्हा पुणे येथील त्यांच्या समाधीस्थळी भावपूर्ण वातावरणात साजरा झाला.

 सत्र न्यायालयाचा पोलीस यंत्रणेवर संताप व्यक्त !

अन्वेषण यंत्रणांच्या दायित्वशून्यतेमुळे ज्या निरपराध्यांना याचा त्रास भोगावा लागतो, त्यांना या यंत्रणेच्या अधिकार्‍यांकडून हानीभरपाई वसूल केली पाहिजे.

स्वातंत्र्यवीर सावरकर नाही, तर जवाहरलाल नेहरू खरे ‘माफीवीर’ ! – भाजप

५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा आनंदाने स्वीकारून ती १५ वर्षे अतोनात यातना सहन करून भोगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करण्याचा नैतिक अधिकार काँग्रेसला नाही.

‘इस्रो’ने प्रथमच केले खासगी रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण !

निर्धारित लक्ष्यानुसार हे रॉकेट अवकाशात १०० किलोमीटर प्रवास करेल आणि त्यानंतर ते समुद्रात कोसळणार आहे. ‘विक्रम एस्’ हे नाव भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक विक्रम साराभाई यांच्या नावावरून देण्यात आले आहे.

शहरी नक्षलवादाचा आरोप असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांना जामीन संमत !

शहरी नक्षलवादाच्या आरोपाप्रकरणी सध्या तळोजा कारागृहात बंदिस्त असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांना उच्च न्यायालयाने जामीन संमत केला.

आतंकवाद पूर्णपणे संपवत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार

भारतातील जिहादी आतंकवाद हा पाकिस्तानने निर्माण केला आहे, जोपर्यंत भारत त्याला संपवत नाही, तोपर्यंत भारतातील जिहादी आतंकवाद आणि भारतातील पाकप्रेमींची जिहादी मानसिकता संपणार नाही, हेही तितकेच सत्य आहे !

उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहादविरोधी कायदा हवा ! – सौ. चित्रा वाघ, प्रदेशाध्यक्षा, भाजप महिला मोर्चा

उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहादच्या विरोधात कायदा व्हायला हवा, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत केली.

ब्रिटनमध्ये आर्थिक मंदी घोषित !

एकेकाळी संपूर्ण जगातील अनेक देशांवर राज्य करून त्यांची अतोनात लूटमार करणार्‍या ब्रिटनवर आलेली ही स्थिती पहाता ‘प्रत्येकाला त्याच्या कर्माची फळे भोगावी लागतात’, हे लक्षात येते !

चंद्रग्रहणापासून घरात सतत आग लागत असल्याने उत्तराखंडमधील कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण

या घटनेविषयी तथाकथित विज्ञानवादी, बुद्धवादी, अंधश्रद्धा निमूर्लनवाले आदींना काय म्हणायचे आहे ?