लंडन (ब्रिटन) – ब्रिटनने आर्थिक मंदी घोषित केली आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मंदीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पावले उचलणार असल्याची घोषणा केली आहे. सुनक यांच्या सरकारने ५ सहस्र ५०० कोटी पौंडची (५ सहस्र ५८ कोटी रुपयांची) आर्थिक योजना सादर केली आहे.
१७ नोव्हेंबरलाच अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी सरकारचा आणीबाणीचा अर्थसंकल्प सादर केला होता. यामध्ये करांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. ब्रिटनमधील महागाई आटोक्यात येत नसल्याने सरकारने कराचे दर वाढवले आहेत. ब्रिटनमध्ये वाढत्या महागाईमुळे सरकारसह सर्वसामान्यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. ब्रिटनमधील महागाईचा दर ऑक्टोबर मासामध्ये ११.१ टक्क्यांवर पोचला असून या वाढीमुळे ४१ वर्षांचा विक्रम मोडला आहे. वर्ष १९८१ नंतरचा हा सर्वाधिक महागाई दर आहे. सप्टेंबर मासामध्ये महागाईचा दर १०.१ टक्के होता.
संपादकीय भूमिका
|