महाकाल सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने वीरयोद्धा लाचित बोरफुकनजी यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन

पूर्वाेत्तर भारतात छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखले जाणारे वीरयोद्धा लाचित बोरफुकनजी यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन !

शासनाने कब्रस्तानाविषयी अहवाल मागितला, कब्रस्तानच्या संरक्षक भिंतीचे काम थांबवले !

अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराच्या शेजारी कब्रस्तान बनवण्याचे प्रकरण ! प्राचीन मंदिराशेजारी उभारल्या जाणार्‍या कब्रस्तानाला विरोध करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन !

पिंपरी (पुणे) येथील दूषित शालेय पोषण आहार देणार्‍या संस्थेला पाठीशी घालणार्‍या उपायुक्तांना निलंबित करा ! – रमेश वाघेरे, माहिती अधिकार कार्यकर्ते

काच किंवा प्लास्टिक आढळून येणार्‍या शालेय पोषण आहाराची पडताळणी केली जाते का ? याचाही शोध घ्यायला हवा !

नागपूर येथील एस्.टी.तील पात्रता परीक्षेत अपव्यवहार प्रकरणी ३ अधिकारी निलंबित !

अपव्यवहार करणार्‍या दोषी अधिकार्‍यांना नुसते निलंबित केल्यास त्यांच्या वृत्तीत काहीच पालट होणार नाही ! त्यामुळे अशा अधिकार्‍यांवर बडतर्फीची कारवाई करून कायमचे घरी पाठवले पाहिजे.

संभाजीनगर येथे पोलिसांची अनुमती न घेता ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात मोर्चा !

‘श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब याला फाशीची शिक्षा द्यावी, तसेच राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्यात यावा’, या मागण्यांसाठी वैजापूर शहरात ‘मूक मोर्च्या’चे आयोजन करण्यात आले होते.

बल्लारपूर (जिल्हा चंद्रपूर) येथील रेल्वे पूल दुर्घटनेप्रकरणी २ अधिकारी निलंबित !

२८ नोव्हेंबर या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वेस्थानकावर पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत शिक्षिका नीलिमा रंगारी यांचा मृत्यू झाला होता. या अपघातात १३ प्रवासी घायाळ झाले होते.

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांविषयी उच्च न्यायालयाने प्राधिकरणाला फटकारले !

मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड प्रमाणात निर्माण झालेल्या खड्ड्यांच्या संदर्भात चिपळूण येथील अधिवक्ते ओवेस पेचकर यांनी याचिका केली आहे. या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला फटकारले आहे

मनसे मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार ! – राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

पक्षाच्या बळकटीकरणासाठी विभागनिहाय दौरे चालू आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढवणार आहे, अशी माहिती अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत दिली.

२ सहस्र ३८६ गावांत ‘बी.एस्.एन्.एल्.’ मनोरे उभारण्यासाठी राज्यशासन विनामूल्य भूमी देणार !

ग्रामीण भागांत ‘४ जी इंटरनेट’ची सेवा पोचावी, यासाठी राज्यातील २ सहस्र ३८६ गावांत भारत सेवा संचार निगम (बी.एस्.एन्.एल्.) चे मनोरे उभारण्यासाठी २०० चौरस मीटर जागा विनामूल्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

घरकुल घोटाळ्यातील माजी आमदार सुरेश जैन यांना जामीन !

२९ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. घरकुल योजनेतील ५ सहस्र घरांपैकी केवळ दीड सहस्र घरे बांधण्यात आली होती.