‘इस्रो’ने प्रथमच केले खासगी रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण !

‘विक्रम सबऑर्बिटल’चे यशस्वी उड्डाण !

श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) – भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ने १८ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ११.३० वाजता येथील ‘सतीश भवन अंतराळ केंद्रा’वरून पहिल्या खासगी रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले.

हे रॉकेट भाग्यनगरच्या ‘स्कायरूट एरोस्पेस’ आस्थापनाचे आहे. या रॉकेटचे नाव ‘विक्रम सबऑर्बिटल’ असे आहे.

 (सौजन्य : MONEYCONTROL)

निर्धारित लक्ष्यानुसार हे रॉकेट अवकाशात १०० किलोमीटर प्रवास करेल आणि त्यानंतर ते समुद्रात कोसळणार आहे. ‘विक्रम एस्’ हे नाव भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक विक्रम साराभाई यांच्या नावावरून देण्यात आले आहे. ‘स्कायरूट एरोस्पेस’ने वर्ष २०२० मध्ये या रॉकेटच्या निर्मितीला प्रारंभ केला. या आस्थापनाला इस्रो आणि इन स्पेस यांनीही साहाय्य केले.