पुण्यात महिला पोलीस कर्मचार्‍याचा विनयभंग करून आत्महत्येचा प्रयत्न करणारा शिपाई बडतर्फ

असे वासनांध पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ?

इंदापूर तालुक्यामधील (जिल्हा पुणे) इयत्ता ९ ते १२ वी पर्यंतच्या ३३ शाळा चालू

इंदापूर तालुक्यात १०४ शाळा असून त्यात १८ सहस्र ६१० विद्यार्थी आहेत. त्यातील ३३ शाळा पहिल्या दिवशी चालू झाल्या आणि त्यामध्ये १ सहस्र ३८८ विद्यार्थी उपस्थित होते.

नियमांचे उल्लंघन करत वाढदिवस साजरा करणार्‍या भाजप नगरसेवकावर गुन्हा !

२२ नोव्हेंबरच्या रात्री नीलेश बाविस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रमंडळींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रात्री विलंबापर्यंत ही मेजवानी चालू असल्याने काही नागरिकांनी खारघर पोलीस ठाण्यात दूरध्वनीद्वारे तक्रारी केल्या.

आळंदीकरांच्या आरोग्याचा विचार करून कार्तिकी यात्रेचे आयोजन करावे ! – आळंदी ग्रामस्थांची मागणी

यंदा आळंदीची कार्तिकी यात्रा ८ ते १४ डिसेंबर या कालावधीत आहे. तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये प्रतिवर्षी कार्तिकी एकादशीला ७ ते ८ लाख भाविक आळंदीत येत असतात.

वीजमीटर खंडित कराल, तर खबरदार ! – गणेश नाईक, आमदार, भाजप

कोरोनाच्या काळात जनतेवर लादलेली वाढीव वीजदेयके तातडीने रहित करा, अशी मागणी करत ‘ग्राहकांचे वीजमीटर खंडित करण्यासाठी आलात, तर खबरदार’, अशी चेतावणी आमदार गणेश नाईक यांनी महावितरणला दिली आहे.

धुपखेडा (जिल्हा संभाजीनगर) येथील साई मंदिरात चोरी

संभाजीनगर-पैठण रस्त्यावरील धुपखेडा येथील प्रसिद्ध असलेल्या श्री साईबाबांच्या मंदिरात २३ नोव्हेंबरच्या पहाटे चोरट्यांनी कुलूप तोडून चोरी केली. यामध्ये साईबाबांच्या मूर्तीचा चांदीचा मुकुट, २ दानपेट्या आणि मंदिराच्या कपाटातील सोन्या-चांदीचे अलंकार चोरट्यांनी पळवले आहेत.

आयी आणि मांगेली गावांच्या सरपंचांवरील अविश्‍वास ठरावावर आज होणार निर्णय

ग्रामसभेत ग्रामस्थ काय भूमिका घेतात, त्यावर सरपंचांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

चोराडे (जिल्हा सातारा) येथे विनाअनुमती बैलगाडी शर्यतीचे आयोजन !

राज्यात बैलगाडी शर्यतीला अनुमती नसतांना चोराडे (जिल्हा सातारा) गावातील भांडमळा येथील मोकळ्या गायरान जागेत काहीजणांनी विनाअनुमती बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले.

ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन यांच्या वतीने समाजसेविका उज्ज्वला निकम यांचा नवदुर्गा गौरव पुरस्कार देऊन गौरव

कोरोना काळात रुग्णांना सकस आहार पुरवणार्‍या कोरेगाव (जिल्हा सातारा) येथील अन्नपूर्णा सौ. उज्ज्वला लिनेश निकम यांना पुणे येथील ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन यांच्या वतीने समाजसेविका उज्वला निकम यांचा नवदुर्गा गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

बत्तीस शिराळा येथे प्रत्येक गुरुवारी नो व्हेईकल डे !

शिराळा नगरपंचायतीने प्रत्येक गुरुवारी नो व्हेईकल डे ! पाळण्याचे ठरवले आहे.