पाकच्या भूलथापांवर विश्वास न ठेवता त्याचा निःपात आवश्यक !

पाक आर्थिक डबघाईला पोचल्यामुळे त्याने राष्ट्रीय धोरणात पालट करून ‘पाकिस्तान पुढील १०० वर्षे भारताशी शत्रुत्व ठेवणार नाही’, असे म्हटले आहे. असे असले, तरी काश्मीरवर मात्र त्याने त्याचा दावा कायम ठेवला आहे.

हिंदूंनो, ‘गड जिहाद’चे षड्यंत्र जाणा !

रायगड जिल्ह्यातील अलीबागजवळ असलेल्या ‘कुलाबा गडा’वर पुरातत्व विभागाच्या कार्यालयाजवळच अनधिकृत थडगे बांधण्यात आले आहे. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे गड आणि त्यांचा परिसर कह्यात घेण्यासाठी असे षड्यंत्र चालू असल्याचे समोर येत आहे.

‘हिंदूंना नियम, तर धर्मांधांना मोकळीक’, हे जाणा !

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या काळात पुणे येथील लोहगडावर पोलीस आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीतच विनाअनुमती उरूस साजरा करण्याची जय्यत सिद्धता चालू आहे.

अशा घटना हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !

आत्मकूर (आंध्रप्रदेश) शहरामध्ये अनधिकृत मशिदीचा विरोध केल्याने धर्मांधांच्या जमावाने पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर आक्रमण केले. धर्मांधांनी या वेळी वाहनांची तोडफोड करत दगडफेक केली.

हिंदू भारतात आणि इस्लामी देशांत किती दिवस मार खाणार ?

बांगलादेशात धर्मांधांनी वर्ष २०२०-२१ मध्ये ३०१ हिंदूंची हत्या केली. धर्मांधानी हिंदूंवर १ सहस्र ८९८ वेळा आक्रमणे केली. ही संख्या वर्ष २०२० च्या तुलनेत ३०० टक्क्यांनी अधिक आहे.

चर्च आणि वक्फ बोर्ड यांची भूमी विकू शकता का ?

ओडिशामधील बिजू जनता दल सरकारच्या मंत्रीमंडळाने पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराची भूमी विकण्यासाठी किंवा भाड्याने देण्यासाठी सरकारी अधिकार्‍यांना अधिकार दिला आहे.

हिंदुद्वेषी काँग्रेसला राजकीयदृष्ट्या संपवा !

भाजपचा पराभव झाला पाहिजे. सनातन धर्म नष्ट झाला पाहिजे. काँग्रेस आघाडीचा मुख्य उद्देश सनातन धर्म नष्ट करणे हा आहे. त्यासाठी काँग्रेसने टिकून राहिले पाहिजे, असे विधान तमिळनाडू काँग्रेसचे अध्यक्ष के.एस्. अलागिरी यांनी केले आहे.

हिंदूंच्या धार्मिक संस्थांना पैसे का दिले जात नाहीत ?

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मदर तेरेसा यांच्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ संचालित १३ संस्थांना मुख्यमंत्री साहाय्य कोषातून ७८ लाख ७६ सहस्र रुपये दिले आहेत.

धर्मांतर झालेले आतंकवादी होतात, हे जाणा !

कर्नाटकमधून दीप्ती मारला उपाख्य मरियम या महिला जिहादी आतंकवाद्याला इस्लामिक स्टेटशी संबंध असल्यावरून अटक करण्यात आली. काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत इदिनब्बा यांची ती सून आहे. दीप्ती हिने धर्मांतर केले आहे.

बिहारमधील ‘जिझिया कर’ जाणा !

गया (बिहार) नगरपालिकेकडून शहरात पिंडदान केल्या जाणार्‍या ५० ‘पिंड वेदी’ येथे पिंडदान करणार्‍याकडून ५ रुपये शुल्क घेतले जाणार आहे. या परिसराची स्वच्छता आणि देखभाल यांसाठी हे शुल्क वसूल केले जाणार आहे.