सर्वधर्मसमभाव केवळ हिंदूंनीच पाळायचा का ?

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेमध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणारे अहसान (वय २२ वर्षे) यांच्यावर मुसलमानांनी सामाजिक बहिष्कार घातला आहे. अहसान यांना धमकीचे दूरभाष येत आहेत. 

धर्मांधांचा उद्दामपणा जाणा !

कर्नाटकातील बोम्मेनहळ्ळी पाळ्य या मुसलमानबहुल गावातील अंगणवाडी केंद्रात मुसलमान कार्यकर्त्याची नेमणूक न केल्याने गेल्या २२ दिवसांपासून धर्मांध गावकर्‍यांनी केंद्राला टाळे लावले आहे.

चर्च आणि मशिदी ही सरकारची संपत्ती का नाही ?

कर्नाटकच्या भाजप सरकारने राज्यातील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी, ‘सरकार एक ऐतिहासिक चूक करत आहे. मंदिरे सरकारची संपत्ती आहे’, असे म्हटले.

इस्लामी देशांतील हिंदूंविषयी नसीरुद्दीन शाह कधी बोलणार ?

‘देशात २० कोटी मुसलमान आहेत. त्यांना तुम्ही (हिंदू) रातोरात नष्ट करू शकत नाही. मुसलमानांवर आक्रमण झाले, तर आम्ही या विरोधात लढा देऊ’, असे विधान अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी केले आहे.

न्यायव्यवस्थेचे भारतीयकरण आवश्यक !

मनु, चाणक्य आणि बृहस्पति यांनी विकसित केलेली पुरातन भारतीय न्यायव्यवस्थाच भारतासाठी योग्य आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुल नझीर यांनी व्यक्त केले आहे.

‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणार्‍या चित्रपटाला वैध मार्गाने विरोध करा !

‘अतरंगी रे’ या हिंदी चित्रपटतून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देण्यात आले आहे.  या चित्रपटात हिंदु नायिकाचे कुटुंबीय मुसलमान नायकाला जिवंत जाळतात. यातून हिंदू ‘हिंसाचारी’, तर मुसलमान ‘पीडित’ दाखवण्यात आले आहेत.

धर्मांधांची आक्रमणे हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !

आगरा (उत्तरप्रदेश) येथील आलमगंज चौकीजवळ राधाकृष्ण मंदिरजवळ दारू पिऊन गोंधळ घालणार्‍या धर्मांधांना रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने धर्मांधांच्या जमावाने संघ कार्यालयाची तोडफोड करत त्यांना मारहाण केली.

अशी मागणी करण्याचे धाडस होतेच कसे ?

हिंदूंचे पवित्र तीर्थस्थळ असणार्‍या द्वारका बेटावरील २ द्वीपांवर सुन्नी वक्फ बोर्डाने दावा करत गुजरात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. द्वारका बेटावर एकूण ८ लहान द्वीप आहेत.

असा कायदा संपूर्ण देशात करायला हवा !

आसाममध्ये आता गोतस्करांनी गेल्या ६ वर्षांत अवैध पशू व्यापारातून मिळवलेली संपत्ती जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला आहे. तसेच गोतस्करांकडून जप्त केलेल्या वाहनांचा आता लिलाव करता येणार आहे.

सरकारी पैसा मंत्र्यांकडून वसूल करा !

केरळ राज्याच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आघाडी सरकारमधील क्रीडा, वक्फ आणि हज यात्रा यांचे मंत्री व्ही. अब्दुरहिमन हे सरकारी खर्चातून वैद्यकीय कारणांसाठी २० दिवसांसाठी अमेरिकेला जाणार आहेत.