कोरोनाची संख्या हळूहळू न्यून होईल ! – डॉ. के. श्रीनाथ रेड्डी, अध्यक्ष, ‘पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया’

देशात दळणवळण बंदी आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’ (एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे) केल्याने कोरोनाचा संसर्ग बर्‍याच प्रमाणात रोखता येईल……

लोकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळतील, घरीच थांबावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोव्यातजीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे; मात्र केंद्राने दिलेल्या नियमांच्या आधारावर ही दुकाने उघडी ठेवण्यात येणार आहेत.

जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गोव्यात नागरिकांच्या मोठ्या रांगा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्याचा घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा आणि संचारबंदीचे कठोरतेने पालन करावे, ही मागणी जोर धरत आहे. राज्यातील विविध क्षेत्रांतील लोक आता ही मागणी करू लागले आहेत.

नाशिकमध्ये विनाकारण रस्त्यावर आणि चौकात गर्दी करण्यार्‍यांवर पोलिसांची ड्रोन कॅमेर्‍याच्या साहाय्याने टेहळणी

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात संचारबंदीचे आदेश लागू असतांनाही येथील जुने नाशिक, वडळा, फुलेनगर झोपडपट्टी परिसर अशा अनेक ठिकाणी नागरिक घराबाहेर पडून विनाकारण रस्त्यावर आणि चौकात गर्दी करत आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याची अफवा पसरवणार्‍यास पोलिसांनी घेतले कह्यात

कोरोना विषाणूच्या संदर्भात ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर ध्वनीमुद्रित क्लिप सिद्ध करून अफवा पसरवणार्‍या एका संशयित व्यक्तीस येथील पोलिसांनी २६ मार्च या दिवशी कह्यात घेतले आहे…

लॅटव्हियामध्ये (युरोप) अडकलेल्या ३७ भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी साहाय्य करणार ! – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विमानसेवा बंद करण्यात आली आहे. याचा परिणाम युरोप खंडातील लॅटव्हियाची राजधानी रीगा विमानतळावर भारतातील ३७ विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यांचा भारतात परतण्यासाठी केंद्रशासनाशी संपर्क चालू आहे.

चंद्रपूर येथील मशिदीतून १४ मौलवी कह्यात

स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी धाड टाकून येथील एका मशिदीतून ११ तुर्कस्तानी, तर भारतातील अन्य भागांतील ३ अशा एकूण १४ मौलवींना कह्यात घेतले आहे…….

मशिदीत न जाता घरातच नमाजपठण करा ! – ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे आवाहन

भारतात ठिकठिकाणी मुसलमान नियम तोडून मशिदीत जाऊन नमाजपठण करत असल्याचे दिसून आले आहे. हे लक्षात घेऊन मुसलमानांच्या धर्मगुरूंनी तात्काळ असे आवाहन करणे आवश्यक होते.

शेकडो कि.मी. अंतर चालत घरी जाणार्‍या मजुरांना साहाय्य करा ! – केंद्रशासनाचे राज्यशासनांना निर्देश

देशात दळणवळण बंदी झाल्यानंतर देशातील अनेक भागांमध्ये रोजंदारीवर काम करणारे मजूर शेकडो कि.मी. अंतर चालत जात त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे….