कोरोनामुक्त झालेल्यांनी ‘प्लाझ्मा’ दान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन

‘प्लाझ्मा’ थेरपीमुळे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आता केवळ १४ ‘प्लाझ्मा’ शिल्लक आहेत. कोरोनापासून बरे झालेल्या रुग्णांनी ‘प्लाझ्मा’ दान करण्यासाठी पुढे यावे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६८ सहस्रांहून अधिक घरगुती, तर ३२ ठिकाणी सार्वजनिक मंडळांत श्री गणेशमूर्तींचे पूजन होणार

श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६८ सहस्रांहून अधिक घरगुती, तर ३२ ठिकाणी सार्वजनिक मंडळांत श्री गणेशमूर्तींचे पूजन होणार आहे. जिल्ह्यात श्री गणेशचतुर्थीपासून २१ दिवसांपर्यंत विविध कालावधींचा गणेशोत्सव साजरा केला जातो.

सावंतवाडीत श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव

सावंतवाडी नगरपरिषदेने शहरातील शिवउद्यानाजवळ श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण केला आहे. सावंतवाडी शहरातील मोती तलावात प्रतिवर्षी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते.

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍याला कोरोनाची लागण

जिल्हा रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांची तपासणी करणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍याचा कोरोनाचा अहवाल सकारात्मक आला आहे.

पबजीच्या आहारी गेल्याने आंध्रप्रदेशातील १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

पबजी या खेळाच्या आहारी गेल्याने खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष होऊन एका १६ वर्षीय मुलाला जीव गमावावा लागल्याची धक्कादायक घटना आंध्रप्रदेशमध्ये घडली आहे. सतत खेळल्याने त्याच्या मेंदूवर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून आले.

कोयना धरणाचे ६ वक्र दरवाजे १ फूट ९ इंचाने उघडले

कोयना धरणाचे ६ वक्र दरवाजे १५ ऑगस्ट या दिवशी सकाळी १ फूट ९ इंचाने उघडण्यात आले असून १० सहस्र ४१० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात चालू झाला आहे.

नेपाळच्या भूमीवर चीनने अतिक्रमण केल्याची घटना उघड करणार्‍या नेपाळी पत्रकाराचा रहस्यमयरित्या मृत्यू

नेपाळमधील ज्येष्ठ पत्रकार बलराम बनिया यांचा रहस्यमय स्थितीत मृत्यू झाला आहे. ते येथील ‘कांतीपूर डेली’ नावाच्या दैनिकाचे साहाय्यक संपादक होते. १० ऑगस्ट या दिवशी ते अचानक बेपत्ता झाले आणि १२ ऑगस्टला त्यांचा मृतदेह नदीच्या किनारी सापडला.

निधन वार्ता

सनातनच्या साधिका सौ. विजया दिलीप कळसकर यांचा मुलगा विश्‍वजीत दिलीप कळसकर (वय २७ वर्षे) यांचे हृदयविकाराने ५ ऑगस्ट या दिवशी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

बागपत (उत्तरप्रदेश) येथील भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या

बागपत (उत्तरप्रदेश) येथे सकाळी बाहेर चालण्यासाठी गेलेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संजय खोखर यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. आक्रमण करणारे तिघे जण होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

आझमगड (उत्तरप्रदेश) जिल्ह्यात शिवमंदिरातील भगवान शिवाच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड

आझमगड जिल्ह्यातील शेखपुरा कबीरूद्दीनपूर या गावातील शिवमंदिरातील भगवान शिवाच्या मूर्तीची अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना ७ ऑगस्टच्या रात्री घडली.