पनवेल येथे कोरोनाची लसच उपलब्ध नाही !

लसीकरण कधी चालू होणार, हे येथील आरोग्य विभागालाही सांगत येत नाही.

औषध आस्थापनांना केंद्रशासनाकडून महाराष्ट्राला औषध न देण्याची सूचना !

नवाब मलिक यांनी पुराव्यानिशी आरोप सिद्ध करावेत ! – केशव उपाध्ये, प्रवक्ते, भाजप

सरसंघचालक मोहन भागवत यांना रुग्णालयातून सोडले

‘पॉझिटिव्ह’ होण्याच्या काही दिवसांपूर्वी डॉ. भागवत यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता.

संभाजीनगर येथे रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी इंजेक्शनचे वितरण करणार !

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार झाल्यानंतर निर्णय घेणारे कचखाऊ प्रशासन !

कराड (जिल्हा सातारा) येथे विनामास्क फिरणार्‍या ८० जणांवर दंडात्मक कारवाई !

विनाकारण आणि विनामास्क शहरात फिरणार्‍या नागरिकांकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड वसूल केला जात आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रुग्ण चाचणीचा अहवाल लवकर द्या !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईच्या आयुक्तांना आदेश !

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला तोंड देण्यासाठी सज्ज रहा ! – मुख्यमंत्री

कोरोनाच्या किती किती लाटा येतील ? ते आज सांगू शकत नाही; मात्र आता राज्यातील उद्योगांनीसुद्धा येणार्‍या लाटेला तोंड देण्याच्या दृष्टीने आवश्यक ते नियोजन आतापासूनच करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १७ एप्रिल या दिवशी केले आहे.

मुंबईमध्ये संपूर्ण दळणवळणबंदी करायला हवी ! – महापौर, मुंबई

कुंभमेळ्याहून परतणार्‍या भाविकांना ‘क्वारंटाईन’ करणाचा विचार

अमरावती मध्यवर्ती बस स्थानक बंद !

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शहरात सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. या कारणास्तव शहरातील मध्यवर्ती बसस्थानक १७ एप्रिल या दिवशी बंद करण्यात आले. प्रशासनाने सकाळी बस स्थानकावर आलेल्या प्रवाशांना बाहेर काढून बस स्थानकाच्या दोन्ही दारांवर ‘बॅरिकेड्स’ लावले.

रेमडेसिविर इंजेक्शनच्या वाटपात विदर्भावर अन्याय झाला आहे ! – चंद्रशेखर बावनकुळे, भाजप

कोविड रुग्णांसाठी संजीवनी ठरत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या वाटपात प्रचंड भेदभाव चालू आहे. राज्य सरकारमध्ये असलेल्या काही नेत्यांनी आपल्या जिल्ह्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पळवला आहे, असा आरोप भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे केला.