जिल्हाबंदीची कार्यवाही कठोरपणे करा ! – शंभूराज देसाई

जिल्ह्याच्या सीमेवरील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना सूचना

सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील पोलीस अधिकार्‍यांकडून माहिती घेतांना (डावीकडून) गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, वाईचे आमदार मकरंद पाटील आणि राज्याचे सहकार मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील

सातारा  – कोरोना आटोक्यात आणण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २ दिवसांपूर्वी जिल्हाबंदीची घोषणा केली आहे. त्या घोषणेच्या कार्यवाहीविषयी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा-पुणे जिल्ह्याच्या सीमेेवरील सारोळा तपासणी नाक्याला भेट देऊन पहाणी केली. तसेच जिल्हाबंदीची कठोरपणे कार्यवाही करण्याच्या सूचना पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना दिल्या.

संचारबंदीच्या पार्श्‍वभूमीवर सातारा आणि सांगली जिल्ह्यांच्या सीमेवरील मालखेड येथील तपासणी नाक्याची पहाणी केल्यानंतर सातारा आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरील सारोळा येथील तपासणी नाक्यावरील कायदा, सुव्यवस्था आणि कडक पोलीस बंदोबस्ताची त्यांनी पहाणी केली. या वेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील उपस्थित होते.