‘टीईटी’ संदर्भातील कार्यवाहीस विलंब झाल्यास अधिकार्‍यांवरच कारवाई !

राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) अपप्रकार केलेल्या उमेदवारांची सुनावणी घेऊन वैयक्तिक मान्यता आणि मान्यता शालार्थ ‘आयडी’ रहित करण्याची प्रक्रिया ८ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते;

कात्रज (पुणे) येथील महापालिकेच्या विसर्जन हौदात गणपतीच्या मूर्ती भग्नावस्थेत पडून !

विसर्जन हौदांतील श्री गणेशमूर्तींचे काय होते, याचे वास्तव जाणून गणेशभक्तांनी धर्मभावना दुखावणार्‍या पुणे महापालिकेला याविषयी खडसावले पाहिजे !

सध्याच्या राजकारण्यांना श्री सरस्वती नको, तर श्री लक्ष्मी हवी आहे ! – कादंबरीकार विश्वास पाटील

माणसे गरीब असतात; कारण त्यांच्याकडे लक्ष्मी नसते. गरिबांना विद्येचा, कलेचा म्हणजेच श्री सरस्वतीचा आधार असतो. श्री सरस्वतीदेवीचा अवमान हा देशाचा अवमान आहे, असे म्हटल्यास चूक ठरणार नाही.

(म्हणे) ‘नागपूरची ‘हाफ चड्डी’ घातल्यावर स्पर्धा परीक्षा द्यावी लागत नाही, माणूस थेट ‘जॉईंट सेक्रेटरी’ होतो ! – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

दिशाहीन काँग्रेस पक्षनेत्यांची अभ्यासहीन वक्तव्ये ! नाना पटोले हे केवळ संघ आणि ब्राह्मण द्वेषापोटी वारंवार अशी वक्तव्ये करतात; कारण त्यांना काँग्रेसमध्ये सभ्यपणाने वागण्याची शिकवणच दिलेली नसल्याचा परिणाम !

‘पी.एफ्.आय.’सारख्या  देशद्रोही संघटनांचा कायमचा बंदोबस्त करावा !

केंद्र सरकारने ‘पी.एफ्.आय.’ (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) संघटनेवर बंदी घालण्याचे स्तुत्य पाऊल उचलले असून ‘पी.एफ्.आय.’सारख्या देशद्रोही संघटनांचा कायमचा बंदोबस्त करावा, तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करावी,

सनातनचे ग्रंथ हे राष्ट्र आणि धर्म यांची चेतना जागृत करणारे ! – ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर

ईश्वरी कृपेमुळे प्राप्त झालेले दिव्य ज्ञान आणि सूक्ष्म चित्रे हे सनातनच्या ग्रंथांचे मुख्य वैशिष्ट्य असून ते अध्यात्माची शिकवण देणारे आहेत. यांचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर यांनी केले.

‘लव्ह जिहाद’चे वृत्त देणार्‍या महिला पत्रकाराला धर्मांधांकडून धमकी !

हिंदुत्वाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न नेहमी धर्मांधांकडूनच होत असतो, हेच या घटनेवरून अधोरेखित होते !

शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये आदी ठिकाणी दूरभाषवर बोलतांना ‘हॅलो’ऐवजी ‘वन्दे मातरम्’ने अभिवादन करण्याचा आदेश !

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सर्वच शासकीय-निमशासकीय आदी ठिकाणी अभिवादन करतांना, तसेच दूरभाष आणि भ्रमणभाष यांवर सहकारी अधिकारी, कर्मचारी यांच्याशी बोलतांना ‘हॅलो’ऐवजी ‘वन्दे मातरम्’ म्हणण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाकडून काढण्यात आला आहे.

आपण माहिती-तंत्रज्ञानात, तर पाकिस्तान आतंकवादामध्ये तज्ञ ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

भारत माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात तज्ञ आहे, तर शेजारचा पाकिस्तान आंतरराष्ट्रीय आतंकवादामध्ये !

बलपूर्वक होणार्‍या धर्मांतराला महाराष्ट्र सरकारने प्रतिबंध घालावा ! – मंगलप्रभात लोढा, पर्यटनमंत्री

बलपूर्वक होणार्‍या धर्मांतराच्या विरोधात उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश यांनी योग्य पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र सरकारनेही याला प्रतिबंध घालावा, असे आवाहन राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.