पुणे येथील प्रसिद्ध बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीची धाड !
गेल्या काही दिवसांपासून अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी चालू होती. याआधी नोव्हेंबरमध्येही चौकशी करण्यात आली होती. सहा वर्षांपूर्वींच्या विदेशी चलन प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.