दूध आणि दुग्‍धजन्‍य पदार्थ : त्‍याचे लाभ, समज अन् गैरसमज

बरेच पालक स्‍वतःच्‍या मुलांविषयी ‘डॉक्‍टर बघा ना, हा दूधच पित नाही. दूध प्‍यायले नाही, तर याला ‘कॅल्‍शियम’ कसे मिळणार ? याची हाडे मजबूत कशी होणार ? दात कसे मजबूत होणार ?’ अशा असंख्‍य काळजीचे विचार आणि तक्रारी घेऊन येतात.

पावसाळा आणि दूध

सतत पाऊस पडत असल्‍यास शरिरातील अग्‍नी मंद होतो. अशा वेळी विशेषतः शाळकरी मुलांना सकाळी भूक नसल्‍यास दूध घेण्‍याचा आग्रह करणे टाळावे. पावसाळा संपल्‍यावर पचनशक्‍तीचा अंदाज घेऊन (भूक किती लागते, हे पाहून) मग दूध चालू करायचे का, ते पहावे.’

सकाळी उठल्‍या उठल्‍या चहासह बिस्‍कीटे खाण्‍याची सवय अयोग्‍य

‘काहींना सकाळी उठल्‍या उठल्‍या चहासह बिस्‍किटे खाण्‍याची सवय असते किंवा बिस्‍किटे नसली, तरी निदान चहा तरी हवाच असतो. अमुक वेळी खाण्‍याची सवय लागली की, प्रतिदिन त्‍या वेळी भूक लागू लागते; परंतु ही भूक ‘खरी भूक’ नसते.

पावसाळ्‍यातील सांधेदुखीवर सोपा उपचार

सततच्‍या पावसामुळे वातावरणात थंडी वाढू लागल्‍यावर अनेकांना हातापायांचे सांधे दुखण्‍याचा त्रास चालू होतो. असे सांधे दुखत असल्‍यास हिटिंग पॅडच्‍या साहाय्‍याने हातपाय शेकावेत. याने दुखण्‍यापासून लगेच आराम मिळतो. शेकण्‍यासाठी गरम पाणी, शेकोटी किंवा केस वाळवण्‍याचे यंत्र (हेअर ड्रायर) यांचाही वापर करता येतो. कोणत्‍याही पद्धतीने दुखणारा भाग शेकणे महत्त्वाचे आहे.’

केवळ स्‍वयंपाकघर नव्‍हे, हे तर एक औषधालयच !

१९ जुलै २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण धने, ओवा, लवंग, जायफळ,दालचिनी यांचे औषधी उपयोग वाचले. आजच्‍या अंतिम भागात काळी मिरी, बडीशेप, आले, सुंठ आदींसह अन्‍य पदार्थांची माहिती येथे देत आहे.       

मुबलक आरोग्‍यपूर्ण पदार्थांचा साठा असतांना टोमॅटोची आवश्‍यकता आहे का ?

अनुमाने १५ वर्षांपूर्वी टोमॅटोचा इतका वापर नव्‍हता. पंजाबी पदार्थांमुळे टोमॅटोचा रस्‍सा (ग्रेव्‍ही) हा प्रकार आला. नाही तर कोकम, चिंच, लिंबू क्‍वचित् आमचूर यांवर आमचे पदार्थ छान बनत होतेच ! कोकम, चिंच, लिंबू, आमचूर

केवळ स्‍वयंपाकघर नव्‍हे, हे तर एक औषधालयच !

१२ जुलै २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण मोहरी, जिरे, हिंग आणि हळद यांचे औषधी उपयोग वाचले. आजच्‍या लेखात धने, ओवा, लवंग, वेलची यांचे औषधी उपयोग येथे देत आहे.

अन्‍नाचे पचन नीट होण्‍यासाठी चावून चावून जेवावे

‘आपण जे अन्‍न जेवतो, ते पूर्णपणे पचले, तरच शरीर निरोगी रहाते. जेवण नीट पचले नाही, तर पोटात वायू (गॅसेस) होणे, बद्धकोेष्‍ठता यांसारखे त्रास होतात. जेवण नीट पचण्‍यासाठी ते पुष्‍कळ बारीक व्‍हायला हवे. यासाठी चावून चावून जेवायला हवे.’

नेहमीच्या विकारांवरील प्राथमिक उपचार

सनातनची आयुर्वेदाची औषधे: सनातन सूतशेखर रस (गोळ्या) आणि सनातन कुटज घनवटी (गोळ्या)

भरपूर पावसानंतर अचानक काही दिवस कडक ऊन पडल्यास पुढील काळजी घ्यावी !

भरपूर पावसानंतर अचानक कडक ऊन पडल्याने शरिरात अचानक पित्त वाढते आणि डोळे येणे, तोंड येणे, अंगावर पुरळ येणे, ताप, गळू (केसतोड) होणे, हातापायांची आग होणे, मूत्रमार्गाची जळजळ होणे, यांसारखे पित्ताचे विकार होऊ शकतात. असे वातावरण असल्यास कोणती दक्षता घ्यावी, हे येथे दिले आहे