|

नवी देहली : मध्यप्रदेशातील धार येथील भोजशाळा माता वाग्देवी मंदिरात येत्या वसंत पंचमीला पूजा करण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. यावर्षी शुक्रवार, २३ जानेवारीला वसंत पंचमी आहे.
ए.एस.आई. ने अपनी सर्वेक्षण रिपोर्ट में 98 दिनों के विस्तृत अध्ययन के पश्चात स्पष्ट रूप से अंकित किया है कि संपूर्ण परिसर माँ सरस्वती के एक हिंदू मंदिर का परिसर है। pic.twitter.com/dcYInFyikE
— Vishnu Shankar Jain (@Vishnu_Jain1) January 19, 2026
नमाजपठणावर बंदी घालण्याची मागणी
हिंदु पक्षाने सर्वोच्च न्यायालयात २३ जानेवारीला असणार्या वसंत पंचमीच्या दिवशी भोजशाळेत मुसलमानांना नमाजपठण करण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ‘त्या दिवशी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि शासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे निर्देश द्यावेत’, अशीही मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती हिंदु पक्षाने केली आहे.
🚨 Demand for Ban on Namaz at Bhojshala on Friday, 23rd January 🚨
🚩 @Vishnu_Jain1, Hindu Front for Justice has approached the Supreme Court with clear, just demands:
🔹 Ban Namaz at Bhojshala on Jan 23 to ensure uninterrupted Hindu Puja
🔹 Urgent hearing for protecting Hindu… pic.twitter.com/juAnIr7dGg— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 19, 2026
‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’ची याचिका
ही याचिका ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’च्या वतीने अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी प्रविष्ट केली आहे. याचिकेत नमूद करण्यात आले आहे की, भोजशाळा परिसरात माता वाग्देवी, म्हणजेच श्री सरस्वती देवीचे मंदिर असून ते ११ व्या शतकात परमार राजाने बांधले होते. या ठिकाणी पूर्वी हिंदू पूजा करत होते; मात्र ७ एप्रिल २००३ या दिवशी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने एक आदेश प्रसारित केला. या आदेशानुसार हिंदूंना प्रत्येक मंगळवारी आणि वसंत पंचमीच्या दिवशी पूजा करण्याची अनुमती देण्यात आली, तर मुसलमानांना प्रत्येक शुक्रवारी दुपारी १ ते ३ या वेळेत नमाजपठण करण्याची मुभा देण्यात आली. ‘वसंत पंचमी जर शुक्रवारच्या दिवशी आली, तर काय करावे ?’, यावर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने अद्याप मौन पाळले आहे.
संपादकीय भूमिकाभोजशाळेमध्ये यापूर्वीच न्यायालयाच्या आदेशाने पुरातत्व विभागाने सर्वेक्षण केले आहे आणि त्यात देवतांच्या मूर्ती अन् अन्य हिंदु अवशेष सापडल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता न्यायालयाने भोजशाळा हिंदूंच्या नियंत्रणात देऊन हा वाद कायमचा संपवावा ! |
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी