तिसर्या महायुद्धाच्या संकटाचा सामना करण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर विचार करतांना यज्ञांचाही विचार करा !
येथे दिलेल्या लेखामध्ये विविध यज्ञांचे केलेले सूक्ष्म परीक्षण मांडले आहे; कारण यज्ञाचा परिणाम सूक्ष्मातून होतो आणि त्याची फलप्राप्ती नंतर दिसून येते. सामान्य व्यक्तींना हा सूक्ष्म परिणाम कळत नाही आणि त्या ‘यज्ञासाठी नाहक केलेला व्यय’, असे म्हणू शकतात. पुढील लेखातील सूक्ष्म परीक्षणातून विविध यज्ञ वेगवेगळ्या स्तरांवर कसे लाभदायक असतात, हे कळते, उदा. त्रासदायक शक्तींचे निर्दालन करणे, शत्रूवर विजय प्राप्त करणे, त्रासदायक शक्तींपासून रक्षण होणे, धन-धान्य आणि समृद्ध शासन मिळणे, अन्नधान्याची कमतरता न पडणे, पाऊस पडणे इत्यादी. विविध यज्ञांचे हे व्यापक परिणाम पूर्वीच्या काळी भारतातील महान राजांना ज्ञात होते आणि ते ऋषीमुनींच्या मार्गदर्शनाखाली हे यज्ञ करत. आताच्या काळात लोकांचे ‘अध्यात्माची कास धरणे’ पुष्कळ अल्प झाले असल्याने त्यांच्याकडून यज्ञांचा उपयोग करून घेण्याचे प्रमाण नगण्य झाले आहे.
सनातन संस्था यज्ञांचे महत्त्व यज्ञांचे संशोधन करून पुनर्स्थापित करत आहे. सनातन संस्था करत असलेले यज्ञ केवळ तिचे साधक आणि संत यांच्यासाठी नसून समाजासाठीही आहेत. समाजाला या यज्ञांचा लाभ लक्षात यावा, यासाठी यज्ञांचे केलेले संशोधन प्रसिद्ध करत आहोत.
आता लवकरच तिसर्या महायुद्धाला आरंभ होणार आहे. याचा सामना करता येण्यासाठी राज्यकर्ते निमलष्कर दले आणि जनता यांची तयारी करवून घेतात, उदा. धोक्याची घंटा वाजवणे, आग विझवायला शिकवणे, घायाळ झालेल्यांना साहाय्य करणे इत्यादी. यामध्ये राज्यकर्त्यांचा विचार केवळ बुद्धीच्या स्तरावर होतो. खरेतर बुद्धीने विचार करण्यासह आध्यात्मिक स्तरावरही विचार केला, तर अधिक लाभ होणार आहे. आध्यात्मिक अंगामध्ये यज्ञांना पुष्कळ महत्त्व आहे; कारण यज्ञाचा पुष्कळ अंतरापर्यंत लाभ होऊ शकतो. एखादे संकट दूर करण्यासाठी योग्य त्या यज्ञाचे योग्य ठिकाणी आणि योग्य काळी आयोजन केले, तर त्या भागातील सर्व हिंदूंना याचा लाभ होईल. सनातन संस्था यासंदर्भात प्रयत्नशील असणार आहे. अन्य राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संस्था अन् संघटना याही यासंदर्भात यज्ञांच्या नियोजनापासून ते प्रत्यक्ष यज्ञ करण्यापर्यंतच्या प्रक्रियेत सहभागी झाल्यास त्यांचीही राष्ट्रासंदर्भातील साधना चांगली होईल.
१६ नोव्हेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘आयुष्य होम आणि बगलामुखी याग’ यांच्याविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(भाग २)
भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/977243.html

हिंदूंनो, तिसर्या महायुद्धाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी यज्ञसंस्कृतीचे पुनरुत्थान करा !

‘यज्ञ हे आध्यात्मिक बळ निर्मितीचे सोपे माध्यम आहे. त्यामुळे प्राचीन काळापासून ‘यज्ञ करणे’ हे इप्सित फलप्राप्ती आणि आपत्ती-निवारण यांसाठीचा सहज मार्ग आहे. त्यामुळे यज्ञाला अधिक महत्त्व आहे. येणारा आपत्काळ आणि तिसरे महायुद्ध यांना सामोरे जाण्यासाठी शारीरिक आणि मानसिक बळ निर्माण करण्याचे विविध मार्ग उपलब्ध होऊ शकतात; पण आध्यात्मिक बळ हे केवळ साधना आणि यज्ञ यांच्याद्वारेच निर्माण होऊ शकते. आवश्यक त्या तीव्रतेने साधना करणे सर्वांना शक्य होत नाही. अशा परिस्थितीमध्ये यज्ञ करणे, हा सर्वांत सोपा आणि सर्वांसाठी पूरक असा मार्ग आहे. यज्ञाचा वातावरणावरही खूप जलद आणि अधिक प्रमाणात सकारात्मक परिणाम होतो, हे विविध वैज्ञानिक संशोधनातूनही सिद्ध झाले आहे. यासाठी हिंदूंनो, आगामी तिसर्या महायुद्धाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आणि त्यापुढे रामराज्य स्थापनेसाठी यज्ञसंस्कृतीचे पुनरुत्थान करा !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
३. वाराहीदेवी याग
वाराहीदेवी ही श्रीविष्णूच्या वराह अवताराची शक्ती आहे. ही देवी त्रास देणार्या वाईट शक्तींचा नाश करून रक्षण करणारी आहे, तसेच ती असूया, म्हणजे मत्सर नष्ट करणारी आहे.
अ. वाराहीदेवीच्या कार्यानुसार तिच्यासाठी केलेल्या यज्ञामध्ये मारक शक्ती असणार, हे उघड आहे. त्याप्रमाणेच यज्ञातून प्रक्षेपित झालेल्या स्पंदनांमध्ये ७० टक्के प्रमाण हे मारक शक्तीचे होते.
आ. यज्ञ करतांना यज्ञामध्ये काही प्रमाणात आकर्षण शक्ती असते आणि काही प्रमाणात प्रक्षेपण शक्ती असते. आकर्षण शक्तीमुळे नकारात्मक स्पंदने यज्ञामध्ये खेचून घेतली जातात आणि ती नष्ट केली जातात. प्रक्षेपण शक्तीमुळे वातावरणातील नकारात्मक स्पंदने नष्ट होतात, तसेच वातावरणात सकारात्मक स्पंदने पसरवली जातात. ‘वाराहीदेवीच्या यज्ञामध्ये वाईट शक्तींना (नकारात्मक स्पंदनांना) खेचून घेऊन नष्ट करण्याचे प्रमाण ३५ ते २५ टक्के होते’, हे लक्षात आले.

इ. यज्ञातून २० ते २५ टक्के प्रमाणात शक्ती आणि ३० ते ३५ टक्के प्रमाणात शांती यांची स्पंदने प्रक्षेपित होत होती. या दोन्ही स्पंदनांमुळे ग्लानी येत होती आणि डोळे उघडे ठेवणे पुष्कळ कठीण होत होते. यज्ञातून प्रक्षेपित होणारी शक्ती पेलवत नव्हती. त्यामुळे ‘यज्ञाचा प्रभाव (सूक्ष्मातील परिणाम) केवढा असेल’, हे लक्षात येते.
ई. यज्ञ ५० टक्के पूर्ण झाल्यावर यज्ञातून वर येणार्या ज्वाळांचे प्रमाण अकस्मात् वाढले, तसेच तेथील वातावरण प्रकाशमान वाटू लागले. तेव्हा यज्ञातून प्रक्षेपित होणार्या चैतन्याचे प्रमाण १५ टक्क्यांवरून २५ टक्के झाले होते. त्यामुळे ‘चैतन्याचा परिणाम कसा दिसून येतो’, हे लक्षात आले. त्या वेळी यज्ञातून प्रक्षेपित होणार्या तारक शक्तीचे प्रमाणही ३० टक्क्यांवरून ४० टक्के झाले होते.
(क्रमश: पुढील रविवारी)
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (रसायनशास्त्रातील पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
(२०.१०.२०२५)
भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/981947.html
|

गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !