तिसर्या महायुद्धाच्या संकटाचा सामना करण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर विचार करतांना यज्ञांचाही विचार करा !
येथे दिलेल्या लेखामध्ये विविध यज्ञांचे केलेले सूक्ष्म परीक्षण मांडले आहे; कारण यज्ञाचा परिणाम सूक्ष्मातून होतो आणि त्याची फलप्राप्ती नंतर दिसून येते. सामान्य व्यक्तींना हा सूक्ष्म परिणाम कळत नाही आणि त्या ‘यज्ञासाठी नाहक केलेला व्यय’, असे म्हणू शकतात. पुढील लेखातील सूक्ष्म परीक्षणातून विविध यज्ञ वेगवेगळ्या स्तरांवर कसे लाभदायक असतात, हे कळते, उदा. त्रासदायक शक्तींचे निर्दालन करणे, शत्रूवर विजय प्राप्त करणे, त्रासदायक शक्तींपासून रक्षण होणे, धन-धान्य आणि समृद्ध शासन मिळणे, अन्नधान्याची कमतरता न पडणे, पाऊस पडणे इत्यादी. विविध यज्ञांचे हे व्यापक परिणाम पूर्वीच्या काळी भारतातील महान राजांना ज्ञात होते आणि ते ऋषिमुनींच्या मार्गदर्शनाखाली हे यज्ञ करत. आताच्या काळात लोकांचे ‘अध्यात्माची कास धरणे’ पुष्कळ अल्प झाले असल्याने त्यांच्याकडून यज्ञांचा उपयोग करून घेण्याचे प्रमाण नगण्य झाले आहे.
सनातन संस्था यज्ञांचे महत्त्व यज्ञांचे संशोधन करून पुनर्स्थापित करत आहे. सनातन संस्था करत असलेले यज्ञ केवळ तिचे साधक आणि संत यांच्यासाठी नसून समाजासाठीही आहेत. समाजाला या यज्ञांचा लाभ लक्षात यावा, यासाठी यज्ञांचे केलेले संशोधन प्रसिद्ध करत आहोत.
आता लवकरच तिसर्या महायुद्धाला आरंभ होणार आहे. याचा सामना करता येण्यासाठी शासनकर्ते निमलष्कर दले आणि जनता यांची सिद्धता करवून घेतात, उदा. धोक्याची घंटा वाजवणे, आग विझवायला शिकवणे, जखमी झालेल्यांना साहाय्य करणे इत्यादी. यामध्ये शासनकर्त्यांचा विचार केवळ बुद्धीच्या स्तरावर होतो. खरेतर बुद्धीने विचार करण्यासह आध्यात्मिक स्तरावरही विचार केला, तर अधिक लाभ होणार आहे. आध्यात्मिक अंगामध्ये यज्ञांना पुष्कळ महत्त्व आहे; कारण यज्ञाचा पुष्कळ अंतरापर्यंत लाभ होऊ शकतो. एखादे संकट दूर करण्यासाठी योग्य त्या यज्ञाचे योग्य ठिकाणी आणि योग्य काळी आयोजन केले, तर त्या भागातील सर्व हिंदूंना याचा लाभ होईल. सनातन संस्था यासंदर्भात प्रयत्नशील असणार आहे. अन्य राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संस्था अन् संघटना याही यासंदर्भात यज्ञांच्या नियोजनापासून ते प्रत्यक्ष यज्ञ करण्यापर्यंतच्या प्रक्रियेत सहभागी झाल्यास त्यांचीही राष्ट्रासंदर्भातील साधना चांगली होईल.
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘आयुष्य होम, बगलामुखी याग आणि वाराहीदेवी याग’ यांच्याविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
(भाग ३)
भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/979602.html

४. कार्तिकेय होम (शत्रूसंहारक होम)
शिव आणि पार्वती यांचा पुत्र कार्तिकेय हा देवांचा सेनापती आहे. त्यामुळे हा होम शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी केला जातो.

अ. यज्ञाला आरंभ झाल्यावर यज्ञातून शक्ती प्रक्षेपित होत असल्याचे जाणवले आणि ती डोळ्यांना जाणवत होती.
आ. हा यज्ञ शत्रूवर विजय प्राप्त करण्याच्या उद्देशाने करत असल्याने तो मारक शक्तीशी संबंधित होता. यज्ञाच्या आरंभी यज्ञातून ७५ टक्के प्रमाणात मारक शक्ती प्रक्षेपित होत होती. यज्ञाच्या मध्यापर्यंत ती ५ टक्क्यांनी वाढून ८० टक्के झाली. पुढे ती थोडी न्यून होत जाऊन यज्ञ पूर्ण झाल्यावर ती ७० टक्के झाली. हे यज्ञाचा उद्देश सफल झाल्याचे द्योतक होते; कारण तेव्हा मारक शक्तीची आवश्यकता अल्प झाली होती.
इ. यज्ञातून प्रक्षेपित होणार्या शक्तीचे प्रमाण प्रथम अधिक (२५ टक्के) होते आणि नंतर ते न्यून (१० टक्के) झाले. त्यामुळे यज्ञाच्या मध्यापर्यंत शक्तीच्या प्रक्षेपणामुळे डोक्यावर जाणवत असलेले जडत्व पुढे जाणवले नाही.

ई. या यज्ञामुळे मिळणार्या देवतातत्त्वांमध्ये कार्तिकेयाच्या तत्त्वाचे प्रमाण २५ टक्के आणि शिवाच्या तत्त्वाचे प्रमाण ७५ टक्के असल्याचे जाणवले. शिवतत्त्व अधिक प्रमाणात मिळत असल्याने यज्ञातून प्रक्षेपित होणार्या शांतीचे, म्हणजे आकाशतत्त्वाचे प्रमाण वाढत जाऊन ते २० टक्क्यांवरून शेवटी ४० टक्क्यांपर्यंत गेले; कारण शिव हा आकाशतत्त्वाशी संबंधित आहे.
उ. कार्तिकेय होम शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी असल्याने तो ९० टक्के वातावरणावर परिणाम करणारा (शक्तीचे प्रक्षेपण करणारा) असल्याचे जाणवले. यज्ञाच्या आरंभापासून ते शेवटपर्यंत यज्ञाची प्रक्षेपण शक्ती ९० टक्के होती.
हिंदूंनो, तिसर्या महायुद्धाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी यज्ञसंस्कृतीचे पुनरुत्थान करा !

‘यज्ञ हे आध्यात्मिक बळ निर्मितीचे सोपे माध्यम आहे. त्यामुळे प्राचीन काळापासून ‘यज्ञ करणे’ हे इप्सित फलप्राप्ती आणि आपत्ती-निवारण यांसाठीचा सहज मार्ग आहे. त्यामुळे यज्ञाला अधिक महत्त्व आहे. येणारा आपत्काळ आणि तिसरे महायुद्ध यांना सामोरे जाण्यासाठी शारीरिक आणि मानसिक बळ निर्माण करण्याचे विविध मार्ग उपलब्ध होऊ शकतात; पण आध्यात्मिक बळ हे केवळ साधना आणि यज्ञ यांच्याद्वारेच निर्माण होऊ शकते. आवश्यक त्या तीव्रतेने साधना करणे सर्वांना शक्य होत नाही. अशा परिस्थितीमध्ये यज्ञ करणे, हा सर्वांत सोपा आणि सर्वांसाठी पूरक असा मार्ग आहे. यज्ञाचा वातावरणावरही खूप जलद आणि अधिक प्रमाणात सकारात्मक परिणाम होतो, हे विविध वैज्ञानिक संशोधनातूनही सिद्ध झाले आहे. यासाठी हिंदूंनो, आगामी तिसर्या महायुद्धाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आणि त्यापुढे रामराज्य स्थापनेसाठी यज्ञसंस्कृतीचे पुनरुत्थान करा !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
५. साम्राज्यलक्ष्मी होम
लक्ष्मीचे हे रूप धन-धान्य आणि समृद्ध साम्राज्य (रामराज्यासारखे शासन) प्रदान करते.

अ. धन-धान्याने समृद्ध होणे आणि रामराज्य आणणे हे तारक तत्त्वाचे कार्य आहे. त्यामुळे हे देणार्या यज्ञातूनही तारक तत्त्वच अधिक प्रमाणात प्रक्षेपित होत होते.
आ. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी शक्ती ही लागतेच. त्याप्रमाणे आरंभी यज्ञातून शक्तीच्या स्पंदनांचे प्रक्षेपण २५ टक्के होते. त्या जोडीला भाव आणि चैतन्य यांची स्पंदनेही २५ टक्के प्रमाणात प्रक्षेपित होत होती. त्यामुळे तेव्हा मारक तत्त्वाचे प्रमाण ३० टक्के होते. पुढे शक्तीच्या स्पंदनांचे प्रक्षेपण अल्प होत जाऊन ते १० टक्के झाले. त्यामुळे तेव्हा मारक तत्त्वाचे प्रमाणही अल्प होत जाऊन तेही १० टक्के झाले.
इ. यज्ञाद्वारे साम्राज्यलक्ष्मीचे तत्त्व ग्रहण करण्यासाठी, म्हणजेच तिची कृपा संपादन करण्यासाठी यज्ञामध्ये आकर्षण शक्तीचे प्रमाण आरंभी ८० टक्के होते. त्यामुळे यज्ञातून फारसा धूर प्रक्षेपित होत नव्हता. यज्ञाच्या शेवटी आकर्षण शक्तीचे प्रमाण ७० टक्के झाले.
ई. आरंभी यज्ञातून तारक शक्तीचे प्रक्षेपण ७० टक्के होत होते आणि शेवटी ते आणखी वाढून ९० टक्के झाले. त्याचप्रमाणे यज्ञातून प्रक्षेपित होणार्या आनंदाचे प्रमाणही आरंभी ५ टक्के होते, ते शेवटी वाढून २० टक्के झाले.
उ. यज्ञाद्वारे मिळणार्या देवतातत्त्वामध्ये २० टक्के प्रमाण देवीचे आणि ८० टक्के प्रमाण श्रीरामाचे होते. श्रीरामतत्त्वाचे प्रमाण अधिक असण्याचे कारण म्हणजे रामराज्य निर्माण झाले की, धन-धान्य आणि समृद्धी ही मिळणारच, तसेच श्रीरामतत्त्व मिळाले की, त्या जोडीला देवीतत्त्व मिळणारच !
नवरात्रीच्या कालावधीत यज्ञांचा हा अभ्यास करता आला, यासाठी मी श्री गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
(समाप्त)
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (रसायनशास्त्रातील पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२०.१०.२०२५)
| सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. |
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !