तिसर्या महायुद्धाच्या संकटाचा सामना करण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर विचार करतांना यज्ञांचाही विचार करा !
या लेखामध्ये विविध यज्ञांचे केलेले सूक्ष्म परीक्षण मांडले आहे; कारण यज्ञाचा परिणाम सूक्ष्मातून होतो आणि त्याची फलप्राप्ती नंतर दिसून येते. सामान्य व्यक्तींना हा सूक्ष्म परिणाम कळत नाही आणि त्या ‘यज्ञासाठी नाहक केलेला व्यय’, असे म्हणू शकतात. या लेखातील सूक्ष्म परीक्षणातून विविध यज्ञ वेगवेगळ्या स्तरांवर कसे लाभदायक असतात, हे कळते, उदा. त्रासदायक शक्तींचे निर्दालन करणे, शत्रूवर विजय प्राप्त करणे, त्रासदायक शक्तींपासून रक्षण होणे, धन-धान्य आणि समृद्ध शासन मिळणे, अन्नधान्याची कमतरता न पडणे, पाऊस पडणे इत्यादी. विविध यज्ञांचे हे व्यापक परिणाम पूर्वीच्या काळी भारतातील महान राजांना ज्ञात होते आणि ते ऋषिमुनींच्या मार्गदर्शनाखाली हे यज्ञ करत. आताच्या काळात लोकांचे ‘अध्यात्माची कास धरणे’ पुष्कळ न्यून झाले असल्याने त्यांच्याकडून यज्ञांचा उपयोग करून घेण्याचे प्रमाण नगण्य झाले आहे.
सनातन संस्था यज्ञांचे महत्त्व यज्ञांचे संशोधन करून पुनर्स्थापित करत आहे. सनातन संस्था करत असलेले यज्ञ केवळ तिचे साधक आणि संत यांच्यासाठी नसून समाजासाठीही आहेत. समाजाला या यज्ञांचा लाभ लक्षात यावा, यासाठी यज्ञांचे केलेले संशोधन प्रसिद्ध करत आहोत.

आता लवकरच तिसर्या महायुद्धाला आरंभ होणार आहे. याचा सामना करता येण्यासाठी शासनकर्ते निमलष्कर दले आणि जनता यांची सिद्धता करवून घेतात, उदा. धोक्याची घंटा वाजवणे, आग विझवायला शिकवणे, घायाळ झालेल्यांना साहाय्य करणे इत्यादी. यामध्ये शासनकर्त्यांचा विचार केवळ बुद्धीच्या स्तरावर होतो. खरेतर बुद्धीने विचार करण्यासह आध्यात्मिक स्तरावरही विचार केला, तर अधिक लाभ होणार आहे. आध्यात्मिक अंगामध्ये यज्ञांना पुष्कळ महत्त्व आहे; कारण यज्ञाचा पुष्कळ अंतरापर्यंत लाभ होऊ शकतो. एखादे संकट दूर करण्यासाठी योग्य त्या यज्ञाचे योग्य ठिकाणी आणि योग्य काळी आयोजन केले, तर त्या भागातील सर्व हिंदूंना याचा लाभ होईल. सनातन संस्था यासंदर्भात प्रयत्नशील असणार आहे. अन्य राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संस्था अन् संघटना याही यासंदर्भात यज्ञांच्या नियोजनापासून ते प्रत्यक्ष यज्ञ करण्यापर्यंतच्या प्रक्रियेत सहभागी झाल्यास त्यांचीही राष्ट्रासंदर्भातील साधना चांगली होईल.
हिंदूंनो, तिसर्या महायुद्धाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी यज्ञसंस्कृतीचे पुनरुत्थान करा !

‘यज्ञ हे आध्यात्मिक बळ निर्मितीचे सोपे माध्यम आहे. त्यामुळे प्राचीन काळापासून ‘यज्ञ करणे’ हे इप्सित फलप्राप्ती आणि आपत्ती-निवारण यांसाठीचा सहज मार्ग आहे. त्यामुळे यज्ञाला अधिक महत्त्व आहे. येणारा आपत्काळ आणि तिसरे महायुद्ध यांना सामोरे जाण्यासाठी शारीरिक आणि मानसिक बळ निर्माण करण्याचे विविध मार्ग उपलब्ध होऊ शकतात; पण आध्यात्मिक बळ हे केवळ साधना अन् यज्ञ यांच्याद्वारेच निर्माण होऊ शकते. आवश्यक त्या तीव्रतेने साधना करणे सर्वांना शक्य होत नाही. अशा परिस्थितीमध्ये यज्ञ करणे, हा सर्वांत सोपा आणि सर्वांसाठी पूरक असा मार्ग आहे. यज्ञाचा वातावरणावरही पुष्कळ जलद आणि अधिक प्रमाणात सकारात्मक परिणाम होतो, हे विविध वैज्ञानिक संशोधनातूनही सिद्ध झाले आहे. यासाठी हिंदूंनो, आगामी तिसर्या महायुद्धाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आणि त्यापुढे रामराज्य स्थापनेसाठी यज्ञसंस्कृतीचे पुनरुत्थान करा !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. आयुष्य होम
या यज्ञाची देवता शिव आहे. यज्ञामध्ये महामृत्युंजय मंत्र म्हणून प्रत्येक आहुती दिली जाते. हा यज्ञ त्याच्या नावाप्रमाणेच आरोग्यावरील संकटे दूर होण्यासाठी अन् दीर्घायुष्य मिळण्यासाठी केला जातो.
१ अ. यज्ञातून प्रक्षेपित झालेली स्पंदने

यावरून यज्ञातून अधिक प्रमाणात मारक तत्त्वाची स्पंदने प्रक्षेपित झाल्याचे आणि यज्ञाच्या कालावधीत त्यांचे प्रमाण १० टक्क्यांनी वाढल्याचे लक्षात आले, तसेच यज्ञातून शक्ती आणि शांती यांची स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित झाली. या यज्ञाची देवता शिव असल्याने यज्ञातून शांतीची, म्हणजे आकाशतत्त्वाची स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित झाली. मारक तत्त्वाची, तसेच शक्तीची स्पंदने अधिक असणे, हे एकमेकांशी जुळते.
१ आ. यज्ञातून प्रक्षेपित झालेल्या स्पंदनांचा आश्रमाच्या नवीन वास्तूवर झालेला परिणाम

यज्ञातून प्रक्षेपित झालेल्या मारक तत्त्वाच्या स्पंदनांमुळे आश्रमाच्या नवीन वास्तूतील नकारात्मक स्पंदने १५ टक्क्यांनी न्यून झाली.
१ आ १. मंत्रोच्चार आणि यज्ञातून प्रक्षेपित होणारी स्पंदने यांचा वातावरणावर होणारा तुलनात्मक परिणाम

२. बगलामुखी याग
या यज्ञाची देवता बगलामुखीदेवी आहे. ही दशमहाविद्यांमधील आठवी देवी आहे. हा यज्ञ सनातनचे साधक आणि संत यांच्यावरील वाईट शक्तींची आक्रमणे दूर करण्यासाठी, तसेच ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ या कार्यामध्ये येणारे वाईट शक्तींचे अडथळे दूर करण्यासाठी झाला.

या अभ्यासातून पुढील सूत्रे लक्षात आली.

अ. बगलामुखी याग हा वाईट शक्तींच्या त्रासाच्या निर्मूलनासाठी असल्याने यज्ञाच्या आरंभापासून ते यज्ञ २५ टक्के पूर्ण होईपर्यंत यज्ञातून शक्तीची स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होत होती आणि ती वाढत जाऊन ४५ टक्क्यांपर्यंत पोचली.
आ. यज्ञातून प्रक्षेपित होणार्या मारक तत्त्वाचे प्रमाणही पुष्कळ अधिक होते.
इ. ५० टक्के यज्ञ पूर्ण झाल्यावर यज्ञातून प्रक्षेपित होणार्या शक्तीचे प्रमाण न्यून होऊन ते २५ टक्के झाले, तसेच पुढे यज्ञ पूर्ण होईपर्यंत यज्ञातून शक्तीचे प्रक्षेपण होण्याचे प्रमाण आणखी न्यून होत जाऊन शेवटी ते १० टक्के झाले.
ई. ५० टक्के यज्ञ पूर्ण झाल्यापासून यज्ञ पूर्ण होईपर्यंत यज्ञातून प्रक्षेपित होणार्या शक्तीचे प्रमाण जसे न्यून होत गेले, तसे यज्ञातून प्रक्षेपित होणार्या मारक तत्त्वाचे प्रमाणही ९० टक्क्यांवरून ७० टक्के झाले.
उ. सूत्र ‘इ’ आणि ‘ई’ यांवरून लक्षात येते, ‘आवश्यकतेप्रमाणे यज्ञातून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचे प्रमाण पालटत जाते आणि हा सूक्ष्मातील पालट सूक्ष्मातील कळणार्यांच्याच, म्हणजे साधना करणार्यांच्याच लक्षात येतो.’
ऊ. बगलामुखी यज्ञाचा उद्देश ‘वाईट शक्तींच्या त्रासाचे निर्मूलन’, हा असल्याने तो उद्देश सफल झाल्यावर यज्ञातून प्रक्षेपित होणारी शक्ती आणि मारक तत्त्व यांचे प्रमाण न्यून होत गेले, तसेच यज्ञातून प्रक्षेपित होणारा आनंद अन् शांती यांचे प्रमाण वाढत गेले. त्यामुळे यज्ञाच्या शेवटी ध्यान लागत होते.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (रसायनशास्त्रातील पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२०.१०.२०२५)
| • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !