पाकिस्तान, बांगलादेशासह ४० देशांतील मुसलमान सहभागी होणार

भोपाळ (मध्यप्रदेश) – येत्या १४ ते १७ नोव्हेंबर या काळात शहरात ७८ वा ‘आलमी तबलीगी इज्तिमा’ आयोजित केला जाणार आहे. या आंतरराष्ट्रीय धार्मिक संमेलनात पाकिस्तान, बांगलादेशासह तब्बल ४० देशांतील मुसलमान प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
🚨 Alert for Bhopal ‘Aalami Tablighi Ijtema’ | भोपाल ‘आलमी तबलीगी इज्तिमा’ पर संतों की चेतावनी
⚠️ Saints & Spiritual Leaders urge vigilance ahead of the mega event.
Participants from 40 nations, incl. Pakistan & Bangladesh to attend.
🔸 “Inspect every camp as done during… pic.twitter.com/C3oPC2XWyi
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 29, 2025
या पार्श्वभूमीवर साधू-संतांनी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण कार्यक्रमाचे निरीक्षण आणि चित्रीकरण करण्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, या काळात प्रत्येक मंडप, प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक हालचाल यांवर प्रशासनाची बारकाईने नजर असली पाहिजे. (जे साधू-संतांना वाटते, ते प्रशासनाला का वाटत नाही ? – संपादक)

साधू-संतांनी घेतली प्रशासनाची भेट !
अखिल भारतीय साधू-संत संन्यासी परिषदेचे अध्यक्ष महामंडलेश्वर अनिलानंद महाराज यांनी अधिकार्यांशी भेट घेतल्यानंतर सांगितले की, महाकुंभसारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यांमध्ये शासन आणि प्रशासन यांना प्रत्येक मंडपापर्यंत पोचण्याची मुभा असते, तर इज्तिमाच्या मंडपामध्येही तशीच नोंद आणि देखरेख असायला हवी. धार्मिक कार्यक्रमांच्या नावाखाली देशविरोधी विधाने किंवा हालचाली घडण्याची शक्यता नाकारता येत नाही; म्हणूनच प्रशासनाने सावधगिरीचे पाऊल उचलले पाहिजे.
महाकुंभप्रमाणे देखरेखीची मागणी
संतांनी मागणी केली आहे की, इज्तिमावर महाकुंभच्या धर्तीवरच देखरेख असावी. महाकुंभमध्ये जर ड्रोन निरीक्षण आणि चित्रीकरण करता येते, तर इज्तिमात का नाही ? या विषयावर आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अधिकृत मागणीपत्र सादर करू.
केवळ ३ देशांमध्येच होतो मेळावा !
जगभरात केवळ पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत (भोपाळमध्ये) येथेच ‘आलमी तबलीगी इज्तिमा’चे आयोजन होते. प्रतिवर्षी लाखो मुसलमान या धार्मिक संमेलनात सहभागी होतात.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी
Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !