डॉ. आनंद रंगनाथन् यांचा जन्म तज्ञ आणि वैज्ञानिक असलेल्या कुटुंबात झाला. त्यामुळे त्यांना ज्ञान आणि सत्य यांचा जीवनभर अंगीकारण्याची पार्श्वभूमी मिळाली. त्यांचे वडील कै. सुब्रमण्यम रंगनाथन् हे प्रख्यात ‘बायोऑर्गेनिक केमिस्ट’ (जैविक रसायनशास्त्रज्ञ) आणि ‘आय.आय.टी. कानपूर’ येथे प्राध्यापक होते अन् त्यांची आई डॉ. दर्शना रंगनाथन् या ‘ऑर्गेनिक केमिस्ट’ (सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ) या क्षेत्रात अग्रणी होत्या. अशा बुद्धीवंताच्या वातावरणात वाढल्याने डॉ. आनंद यांना तरुण वयात विज्ञान आणि चिकित्सक दृष्टीने विचार करण्याची आवड निर्माण झाली. देहली येथील सेंट स्टीफन्स महाविद्यालयातून त्यांनी ‘रसायनशास्त्र’ या विषयात ‘बी.एस्सी. (ऑनर्स)’ ही पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांना इंग्लंडमधील केंब्रिज विश्वविद्यालयाची प्रतिष्ठित अशी ‘नेहरू सेन्टेनरी शिष्यवृत्ती’ मिळाली. केंब्रिजमधील पेमब्रोक महाविद्यालयातून त्यांनी नैसर्गिक विज्ञानातील ‘बी.ए.(ट्रीपोस)’ ही पदवी, त्यानंतर ‘एम्.एम्.’ ही पदवी आणि ‘पीएच्.डी.’ ही पदवी मिळवली. ही पदवी मिळाल्यानंतर ‘बायोकेमिस्ट्री’ (जीवरसायनशास्त्र) या विषयात प्राविण्य मिळवले. अशा त्यांच्या दैदीप्यमान शैक्षणिक पार्श्वभूमीने त्यांची ‘वैज्ञानिक’ कारकीर्द आणि त्यानंतर समाजातील ‘विद्वान’ या भूमिकांचा पाया रचला गेला.

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक
![]() |
![]() |
![]() |
डॉ. आनंद रंगनाथन् यांची विविध रुपे !
१. वैज्ञानिक कारकीर्द आणि कामगिरी
‘डॉक्टरेट’ ही पदवी मिळवल्यानंतर डॉ. रंगनाथन् केंब्रिज विश्वविद्यालयाच्या ‘बायोकेमिस्ट्री’ विभागामध्ये ‘पोस्ट डॉक्टरल फेलो’ म्हणून वर्ष १९९८-९९ मध्ये आपली कारकीर्द चालू केली. त्यांनी विदेशात स्थायिक होण्याऐवजी भारताच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी हातभार लावण्यासाठी देशात परत येण्याचे ठरवले. वर्ष १९९९ मध्ये नवी देहली येथील ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनीअरींग अँड बायोटेक्नोलॉजी’मध्ये संशोधक वैज्ञानिक म्हणून काम पहात पुढील १६ वर्षे त्यांच्या स्वतःच्या प्रयोगशाळेत काम केले. या काळात त्यांनी ‘मॉलिक्युलर बायोलॉजी’ (आण्विक जीवशास्त्र) या क्षेत्रात विशेषतः ‘डायरेक्टेड इव्हॉल्युशन अँड पॅथोजिनेसीस’ या विषयात अभूतपूर्व संशोधन केले. या त्यांच्या संशोधनाचा क्षयरोग आणि मलेरिया या रोगांविषयी थेट परिणाम होता. या नवीन संशोधनामुळे ‘एक बुद्धीमान शास्त्रज्ञ’ म्हणून त्यांना मिळालेली मान्यता अधोरेखित झाली.

वर्ष २०१५ मध्ये नवी देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील ‘स्पेशल सेंटर फॉर मॉलिक्युलर मेडिसीन’ या केंद्रात साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. वर्ष २०१९ मध्ये ते विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक आणि साथीच्या रोगांविषयी ‘प्रगत संशोधक’ म्हणून जवाहरलाल नेहरू विद्यापिठात पूर्णवेळ प्राध्यापक झाले. त्यांच्या कारकीर्दीत त्यांना ‘इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी’कडून ‘यंग सायंटिस्ट पदक (२००७)’ (युवा शास्त्रज्ञ) आणि ‘वर्ल्ड अकॅडमिक फोरम’ यांचा ‘यंग सायंटिस्ट पुरस्कार (२०१२)’ हे दोन प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले.

२. लेखक, समीक्षक आणि समाजातील विद्वान म्हणून सार्वजनिक मान्यता
डॉ. रंगनाथन् यांचा वैज्ञानिक म्हणून असलेल्या जीवनातील प्रवासासह त्यांनी एक लेखक, स्तंभलेखक आणि पत्रकार म्हणून लेखन करत समाजातील ‘प्रख्यात बुद्धीवंत’ म्हणून नाव मिळवले आहे. त्यांनी आतापर्यंत ५ पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांनी वर्ष २०१२ मध्ये ‘द लँड ऑफ विल्टेड रोझ’, वर्ष २०१५ मध्ये ‘फॉर लव्ह अँड ऑनर’, वर्ष २०१९ मध्ये सहलेखिका चित्रा सुब्रमण्यम् यांच्यासह ‘द रॅट ईटर’, वर्ष २०२३ मध्ये ‘सौफल’ आणि ‘हिंदु इन हिंदु राष्ट्र’ ही पुस्तके लिहिली. (त्यांचे आगामी पुस्तक भारतातील विस्मृतीमध्ये गेलेल्या वैज्ञानिकांविषयी असून त्यातून त्यांच्या आवडीचे पैलू लक्षात येतात.) स्तंभलेखक म्हणून त्यांचे लेख ‘न्यूज लाँड्री’, ‘डी.एन्.ए.’, ‘फर्स्टपोस्ट’, ‘दी न्यूज मायन्यूट’ यांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यानंतर ‘स्वराज्य’ या मासिकात ‘सल्लागार संपादक’ म्हणून त्यांनी सातत्याने लेखन केले. त्यांच्या लेखनातून तीक्ष्ण विश्लेषण आणि उपहास आहे, जो दांभिकताविरोधी लिहिणार्या टीकाकारांशी संबंधित आहे.
केवळ लेखनच नव्हे, तर ते भारतीय वृत्तवाहिनीवरील एक ओळखीचा चेहरा बनले. वर्ष २०१० नंतर प्रमुख वृत्तवाहिन्यांच्या चर्चासत्रांमध्ये ते नियमितपणे दिसू लागले, ज्यामध्ये त्यांची तीक्ष्म बुद्धीमत्ता आणि घटनांच्या माहितीविषयीचे प्रभुत्व यांतून त्यांचे वेगळेपण दिसू लागले. त्यांची अर्थपूर्ण वाक्ये आणि तीक्ष्ण हस्तक्षेप असलेल्या त्यांच्या ‘स्वराज्य’मधील लेखनांमधून सामाजिक माध्यमांतील समीक्षकांमधील सर्वाधिक अनुयायी असलेले ते ‘समीक्षक’ बनले. ‘एक्स’ आणि ‘दूरदर्शन’वरील त्यांचे संदेश परिणामकारक ठरत आहेत. त्याच्या ‘@ARanganathan72’ या ‘एक्स’ हँडलमधून ते बेधडक ट्वीट करतात आणि त्यांचे ट्वीट हे प्रखर अन् माहितीपूर्ण असल्याने त्यांचे सहस्रो ‘फॉलोअर्स’ (अनुयायी) आहेत.

३. इस्लामच्या जहालवादाविषयी निर्भयपणे टीका
डॉ. रंगनाथन् यांना सार्वजनिक मान्यता मिळण्याचे मुख्य कारण, म्हणजे ते इस्लाममधील जहालवाद आणि धार्मिक मूलतत्त्ववाद यांविषयी ते निर्भीडपणे टीका करतात. ज्या काळात अनेक बुद्धीमान लोक या विषयावर बेधडक बोलणे टाळतात आणि शांत रहातात तिथे डॉ. रंगनाथन् बेधडकपणे बोलतात. ते युक्तीवाद करत ‘तथाकथित इस्लामी जहालवादी मूळ शिकवणीचा शब्दशः अर्थ घेतात आणि लपून रहाण्यापेक्षा या वास्तवाला सामोरे जा’, असे समाजाला आवाहन करतात. ‘दूरदर्शन’वरील चर्चांमध्ये एखादे प्रकरण आणि त्यातील परिच्छेद सांगण्यातही ते मागे-पुढे पहात नाहीत, उदा. जहालवादी वापरत असलेले कुराणातील परिच्छेद ते निर्भीडपणे मांडतात. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे मूलतत्त्ववादी त्यांना रागाने लक्ष्य करण्याचा प्रयत्न करतात; परंतु ते त्यातही स्थिर आहेत.
| Anand Ranganathan Launches his Book Hindus in Hindu Rashtra | Sudhanshu Trivedi | #TJD2023 (सौजन्य : The Jaipur Dialogues) |
४. हिंदूंचे हक्क आणि न्याय यांविषयी देण्यात येत असलेला लढा
आधुनिक भारतामध्ये हिंदूंच्या हक्कांविषयी बोलणारे सर्वांत लोकप्रिय वक्ते म्हणून ते प्रसिद्धीला आले असून त्यांना अनेक जण ‘हिंदु योद्धा’ या टोपण नावाने ओळखले जातात. यात महत्त्वाचे म्हणजे डॉ. रंगनाथन् हे जाहीररीत्या नास्तिक आहेत. ते एखाद्या प्रश्नाचा स्वतःच्या धार्मिकतेच्या दृष्टीने विचार न करता अधिक बांधिलकीने सभ्यतेला न्याय आणि समान दर्जा देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. एक निरीक्षक म्हणून आश्चर्याचे, म्हणजे हिंदूंची भारतातील दुर्दशा ही इतकी घृणास्पद आहे की, एखाद्या नास्तिकालाही त्याचा त्रास होईल, हे अधोरेखित होत असतांना डॉ. रंगनाथन् यांचा लढा केवळ धर्माविषयी नाही; पण एकूण सभ्यतेविषयी आहे. दुसर्या शब्दांत सांगायचे झाले, तर हिंदूंच्या हक्कांचा प्रश्न हा मूलतः निधर्मी समाजामध्ये मानवाधिकार आणि निष्पक्षता यांविषयी आहे. वर्ष २०२३ मधील त्यांच्या ‘हिंदुज इन हिंदु राष्ट्र’ यामध्ये त्यांनी केलेल्या घणाघाती टीकेमध्ये ‘स्वतंत्र भारतामध्ये हिंदू बहुसंख्य असूनही पद्धतशीरपणे त्यांचे समान हक्क आणि प्रतिष्ठा डावलली जात आहे’, असे ते लिहितात.

अ. काश्मिरी हिंदु आणि हिंदूंचे हक्क यांविषयी लढा : या पुस्तकात हिंदूंना सामोरे जावे लागणार्या संस्थांमधील भेदभाव आणि अन्याय यांविषयीच्या समस्या मांडल्या आहेत, उदाहरणार्थ अल्पसंख्यांक धर्मियांकडून हस्तक्षेप होत असतांना हिंदु मंदिरांवर सरकारचे असलेले नियंत्रण आणि त्याला जोडून मंदिराचा महसूल हडप करणे, अवैधपणे भारतात आलेल्या रोहिंग्या मुसलमानांना आश्रय मिळतो; परंतु काश्मिरी हिंदूंना त्यांच्या मातृभूमीमध्ये परत जाता येत नाही. मुसलमानांच्या न्यासांना पुष्कळ अधिकार देणारे आणि हिंदूंविषयी भेदभाव करणारे वक्फ कायद्यांसारखे कायदे, हिंदूकडून चालवल्या जाणार्या शाळांमध्ये हस्तक्षेप करणारी शैक्षणिक धोरणे, तर याउलट अल्पसंख्यांक शाळांना स्वायत्तता दिली जात आहे. डॉ. रंगनाथन् यांचे म्हणणे आहे की, या घटना केवळ कशा तरी घडलेल्या नाहीत, तर घटना आणि न्यायालयीन चौकट यांमध्ये पद्धतशीरपणे घुसडल्या गेल्या आहेत, जेणेकरून त्यांच्या देशामध्ये हिंदु केवळ दुय्यम दर्जाचे नव्हे, तर आठव्या दर्जाचे नागरिक झाले आहेत. काश्मीरमधून हिंदूंचे पलायन हे मार्मिक उदाहरण ते नेहमी देतात. वर्ष १९९० च्या काश्मीरमधील हिंदूंच्या हत्याकांडाच्या वेळी जवळजवळ ७ लाख हिंदूंना काश्मीर सोडण्यास भाग पाडले गेले आणि यंत्रणेने त्यांना वाऱ्यावर सोडून दिल्याने ते आता १० वर्षांनंतर त्यांच्याच भूमीत निर्वासित म्हणून रहात आहेत. आपल्या देशातील लोकांना पुनर्स्थापित करण्याऐवजी सध्या भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये मिळून ४० सहस्र रोहिंग्या मुसलमान (म्यानमारमधील निर्वासित) रहात आहेत.
वर्ष २०१७ मध्ये घेतलेला न्यायालयीन निर्णय (नंतर त्यांच्या ट्वीटमध्ये त्याचा उल्लेख आहे) ज्यामध्ये न्यायालयाने ‘काश्मिरी हिंदूंच्या हत्यांकांडाविषयी खटले चालवण्यास आता पुष्कळ विलंब झाला’, असे म्हणणे म्हणजे ‘कायद्याची फसवणूक आहे’, असे म्हणून डॉ. रंगनाथन् यांनी त्याचा निषेध केला आहे. ‘मला या अवमानाविषयी उत्तरदायी धरा; परंतु हिंदूंवरील अत्याचारांच्या खटल्यांची सुनावणी होऊ नये, असे म्हणणार्या न्यायाधिशांनी गुन्हा केला आहे’, अशा प्रकारे डॉ. रंगनाथन् यांनी हिंदु पीडितांना दारे बंद करणार्या न्यायव्यवस्थेविषयी संताप व्यक्त केला आहे. ज्येष्ठ न्यायाधिशांविषयीची त्यांनी व्यक्त केलेल्या अशा प्रकारच्या तीव्र नैतिक स्पष्टतेमुळे त्यांच्या चाहत्यांना ते धाडसी वाटतात, तर त्यांच्या विरोधकांना ते उद्धट वाटतात.
आ. मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात लढा : त्यांच्या कार्यातील अजून एक महत्त्वाचा टप्पा, म्हणजे हिंदु मंदिरांवर असलेल्या सरकारी नियंत्रणाच्या विरोधात त्यांचा लढा ! तमिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये हिंदूंच्या १ लाखांहून अधिक मंदिरांवर असलेले सरकारचे नियंत्रण, म्हणजे मंदिरात येणारा पैसा आणि मंदिरांची मालमत्ता यांवर नियंत्रण असून अशा प्रकारचे नियंत्रण चर्च आणि मशिदी यांवर नाही. ते याला ‘स्वतंत्र भारतातील सर्वांत मोठी हानी करणारा आर्थिक घोटाळा’, असे संबोधतात. यामध्ये मंदिरांचा पैसा सामाजिक कारणांसाठी किंवा अल्पसंख्यांकांकडे वळवला जात आहे. याउलट हिंदूंचे न्यास मात्र गरीब आहेत. याविषयी डॉ. रंगनाथन् यांचे म्हणणे आहे, ‘भारत हा खरोखरच निधर्मी आहे, तर देशाने केवळ हिंदूंच्या निवडक श्रद्धास्थानांना राष्ट्रीयीकरणाचे प्राधान्य देण्यापेक्षा धर्माच्या चौकटीच्या बाहेर आले पाहिजे.’ ते म्हणतात, ‘मंदिराच्या महसूलातून वापरल्या गेलेल्या संपत्तीतून असंख्य शाळा आणि रुग्णालये यांना निधी देता आला असता, तसेच हा निधी हिंदूंच्या कल्याणाकरता ही वापरता आला असता.’ डॉ. रंगनाथन् यांनी केलेली ही अभिव्यक्ती समान हक्कांचा विचार केला, तर अगदी साधी वाटू शकते. ते म्हणतात, ‘हे कशा प्रकारे हिंदु राष्ट्र आहे, जिथे हिंदु मंदिरांवर सरकारचे नियंत्रण आहे. ज्यामध्ये सरकार हिंदु मंदिरांच्या मालकीची सहस्रो एकर भूमी हडप करत आहे ?’
इ. हिंदूंवर निधर्मीपणाच्या नावाखाली होणार्या दडपशाहीच्या विरोधात प्रखर विचार : स्तंभलेखन, सार्वजनिक भाषणे आणि दूरदर्शनवरील प्रखर भूमिका यांमधून डॉ. रंगनाथन् यांनी निवडक कायदे आणि नियम ज्याद्वारे हिंदूंमध्ये सुधारणा करण्याची मागणी होते; परंतु अल्पसंख्यांकांमध्ये काही सुधारणा करण्याची मागणी होत नाही, असे कायदे आणि नियम यांच्याविरुद्ध लढा दिला आहे. यासाठी पुरोगामी न्यायालये आणि कार्यकर्ते सुधारणेच्या नावाखाली हिंदु धर्मातील प्रथांना लक्ष्य करतात, यांची ते नेहमी उदाहरणे देतात. (मग ‘ते शबरीमला येथील मंदिरात प्रवेश देण्याविषयीचे नियम असो किंवा दिवाळीच्या वेळी फटाक्यांवर बंदी असावी’, अशी मागणी होते) याउलट इतर धर्मातील प्रतिगामी आणि भेदभाव करणार्या प्रथांविषयी मात्र स्पष्टपणे कुणीही न बोलता शांत असतात. त्यांची चळवळ म्हणजे हिंदूंना विशेष वागणूक मिळावी, यासाठी नाही; परंतु तो एकच समाज आहे की, ज्याचे मूलभूत हक्क डावलले जातात किंवा त्यांचा उपहास केला जातो, असे असू नये. हिंदूंच्या प्रश्नावरील त्यांच्या तीव्रपणे असलेल्या मतांव्यतिरिक्त सर्व प्रकारच्या कट्टरतेच्या विरोधात त्यांची नैतिकता आहे. ते परत परत सांगतात, त्यांच्या दृष्टीने भारत असा देश असावा, जिथे समानता असावी. असा देश जिथे धर्मनिरपेक्षता हा हिंदूंवर दडपशाही करण्याचा कायदा नसावा. भारताची बहुलवादी विचारसरणी आणि विश्वास अन् अभिव्यक्ती यांचे स्वातंत्र्य सर्वांना आहे, याविषयी ते लोकांना पुन्हा पुन्हा आठवण करून देतात.
त्यांच्या दृष्टीकोनातून इतिहास आणि समकालीन माहिती यांतून दुसरेच कथानक सांगितले जाते. येथील बहुसंख्यांक समाज हा नेहमीच सहनशील आहे आणि येथील अल्पसंख्यांकांना अधिक प्रमाणात घटनात्मक संरक्षण आहे. ते हिंदूंनी वसाहतवादातून निर्माण झालेली अपराधीपणाची भावना आणि खालच्या प्रतीचा असलेला वर्णभेद झटकून त्यांच्या हक्कांसाठी आत्मविश्वासाने उभे राहिले पाहिजे, याविषयी ते नेहमीच हिंदूंना आवाहन करतात.
५. डॉ. आनंद रंगनाथन् यांची वैज्ञानिक बुद्धी, लेखनाची प्रतिभा आणि योद्धा वृत्ती या गुणांद्वारे विषयांची मांडणी
डॉ. आनंद रंगनाथन् यांचा निखळ धाडसीपणा आणि त्यांच्या वक्तव्यातील स्पष्टता यांमुळे ते जनमानसांमधील प्रसिद्ध व्यक्तीमत्त्व ठरले आहेत. मग ते विद्यापिठातील व्याख्यान असो किंवा पुस्तकाचे प्रकाशन असो किंवा दूरदर्शनवरील चर्चासत्र असो ते मोजूनमापून चांगले शब्द असलेली इंग्रजी बोलतात, ज्याला विनोदाची झालर असते, तसेच ते त्यांच्या विरोधकांना नमवण्यासाठी ऐतिहासिक घटना किंवा आकडेवारी स्पष्ट करतात. दूरदर्शनवरील चर्चांमध्ये राजकीय नेते आरोप करतात, तेव्हा ते स्वस्थ बसलेले असतात आणि जेव्हा त्यांची वेळ येते, तेव्हा ते त्यांचा युक्तीवाद खोडून काढून त्यातील दांभिकपणा उघड करतात, उदा. एका चर्चासत्राच्या वेळी हिंदूंनी उत्सवात नामस्मरण करण्याविषयीच्या टीकेला प्रतिसाद देतांना ते म्हणतात, ‘‘आता आपण अपराधीपणाची भावना असलेले हिंदू राहू नये. आपण असे करून थकलो आहोत.’’ डॉ. रंगनाथन् यांचा सामाजिक माध्यमांतील सहभाग हा बचावात्मक चर्चांपुरता मर्यादित नाही. भारत आणि हिंदु सभ्यता कशासाठी आहे, याविषयीची स्फूर्तीदायक दृष्टी ते देतात. स्वामी विवेकांनद किंवा म. गांधी यांचे अपरिचित विचार सांगण्यापेक्षा ते प्रेक्षकांना सनातन धर्माच्या धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक स्वभावाविषयी सांगतात. हिंदु धर्माचे सौंदर्य असे आहे की, मोठ्या सभ्यतावादी कुटुंबामध्ये विश्वास न ठेवणार्यांनाही तो स्थान देतो. महाविद्यालयातील आणि यू ट्यूबवरील कार्यक्रमांतून त्यांनी तरुणांना ‘कुणाचाही द्वेष न करता त्यांच्या परंपरेचा अभिमान बाळगा, इतिहासाचा अभ्यास करा आणि कुणाचीही मर्जी न सांभाळता हक्कांची मागणी करा’, यांसाठी प्रोत्साहित केले. ‘बहुसंख्यांकांसाठी समान हक्क’ हा त्यांचा मंत्र सामाजिक माध्यमांतून युवकांच्या पिढीपर्यंत पोचला असून युवकांच्या निराशेविषयी ते आवाज उठवत आहेत.
| Freedom of Speech & Expression Religious freedom and Minoritism #j_Sai_deepak #Anand_Rangnathan भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्याक या विषयावरील परखड विचार मांडतांना पहा –
(सौजन्य : Vivek Vichar Manch) |
डॉ. रंगनाथन् हे विवेकाने विचार मांडणार्या बुद्धीवंतांमधील एक स्थिर नाव झाले आहे. साहित्यिक उत्सव, विचारवंतांच्या परिषदा आणि वेबिनार यांमध्ये सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता जे. साईदीपक आणि इतिहासकार विक्रम संपथ यांसारख्या स्पष्टवक्तेपणा असलेल्या वक्त्यांसह ते विविध व्यासपिठांवर असतात. या व्यासपिठावरून ते ‘मॉलिक्युलर बायोलॉजी’ आणि मध्ययुगीन इतिहास’ यांचा समकालीन राजकारण यांचा संबंध स्पष्ट करून त्यांच्या विविध शाखांतील बुद्धीमत्तेला मूर्त स्वरूप देतात. धार्मिक दंगली किंवा न्यायालयाचे निर्णय यांविषयी पुरावे आणि माहिती यांवर भर दिल्याने त्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन स्पष्ट होतो. त्यांच्यात वैज्ञानिक बुद्धी, लेखनाची प्रतिभा आणि योद्धा वृत्ती या अनोख्या गुणांचा मिलाप आहे. यामुळे त्यांना आधुनिक काळातील ‘हिंदुत्व योद्धा’ असे संबोधले जाते. रस्त्यावर येऊन लढाई करण्यापेक्षा कारणमीमांसा, संशोधन आणि वक्तृत्व अन् त्याला जोडून क्रौर्य अन् चातुर्य ही त्यांची शस्त्रे आहेत.
हिंदुत्वाविषयी निःस्वार्थीपणे कार्य करणारे हेच माझे स्फूर्तीस्थान ! – डॉ. आनंद रंगनाथन्
डॉ. आनंद रंगनाथन् यांना कुणाकडून स्फूर्ती मिळाली ?, याविषयी सांगतांना ते नम्रपणे सांगतात, ‘‘माझी यात काही भूमिका नाही. हिंदुत्वासाठी ज्यांनी पुष्कळ काही केले आहे, त्यांच्याकडून मला स्फूर्ती मिळाली. त्यांना निःस्वार्थीपणे कार्य करतांना पाहून नम्र व्हायला होते, खरोखरच ते अविश्वसनीय आहे. यांपैकी काही जणांची नावे घ्यायची झाली, तर अधिवक्ता जे. साईदीपक, विक्रम संपथ, टी.आर्. रमेश आणि इतर अनेक जण आहेत. ही सर्व खरोखर प्रसिद्ध व्यक्तीमत्त्वे आहेत जी माझी स्फूर्तीस्थाने आहेत. त्यापुढे मी अगदी छोटा आहे.
६. स्फूर्तीदायक स्पष्टता आणि धाडस आणि हिंदूंनी करावयाचे पालट
डॉ. रंगनाथन यांचा केंब्रिज विद्यापिठातील सभागृहे, जवाहरलाल विद्यापीठ, गजबजलेल्या वृत्तवाहिन्यांच्या खोल्या आणि देहलीमधील दूरदर्शनचा स्टुडिओ असा हा प्रवास स्पष्टता आणि धैर्य यांचे स्फूर्तीदायक असे उदाहरण आहे. हा माणूस आपल्या प्रयोगशाळेतील प्रयोगांचे निकाल आणि त्यांची जर्नलमधून प्रसिद्धी यांमध्ये समाधान मानून शांत प्रवृत्तीचा वैज्ञानिक बनू शकला असता; परंतु त्याऐवजी त्यांनी काही मोठ्या अशा धार्मिक कट्टरता आणि धर्मनिरपेक्ष उच्चभ्रू वर्गाची आत्मसंतुष्टता यांना आव्हान देण्यासाठी घटना अन् निर्भय विश्वास यांच्या आधारावर सार्वजनिक व्यासपिठांवर पाऊल ठेवले. हे करतांना त्यांनी अनेक भारतियांना बोलण्याची स्फूर्ती दिली. प्रभावी कथानकांमुळे (नॅरेटिव्हजमुळे) गोंधळात पडलेल्या किंवा गप्प बसलेल्या असंख्य तरुणांना डॉ. रंगनाथन यांची व्याख्याने ऐकल्यावर किंवा त्यांचे साहित्य वाचल्यावर स्वतःचा आवाज मिळाला. तार्किक युक्तीवाद आणि नैतिकता यांच्यावर आधारित असलेल्या सार्वजनिक व्याख्यानांवर भर देऊन त्यांनी एखादा अभ्यासू, उपलब्ध असलेला, प्रखर विचार मांडणारा अन् तत्त्वनिष्ठ माणूस असू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले. रंगनाथन् यांचा प्रभाव राजकारणाच्या पलीकडे आहे, हे महत्त्वाचे आहे. नेहमी चर्चासत्रांमधून हिंदुत्वाची बाजू मांडतांना ते कोणताही राजकारणी किंवा राजकीय पक्ष यांच्या अपयशाविषयी बोलल्याशिवाय रहात नाहीत. त्यांनी सध्या सत्तेवर असलेल्या राजकीय पक्षाने हिंदूंच्या हक्कांविषयी काही न केल्याने त्यांच्या दांभिकतेविषयीही टीका केली आहे.

प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि लेखक डॉ. आनंद रंगनाथन यांनी त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकातील रॉयल्टीचा काही भाग आमच्या निर्वासित पुनर्वसन फाउंडेशनला दान केला – स्वाती गोयल शर्मा
|
यातून स्पष्ट होते की, कोणत्याही पक्षाचा मसुदा हे त्यांचे ध्येय नाही, तर सत्य आणि न्याय याचा शोध हे ध्येय आहे. डॉ. रंगनाथन् यांनी अनेक विशेषणे मिळवली आहेत. शास्त्रज्ञ, प्राध्यापक, लेखक, स्तंभलेखक, चिथावणी देणारा, मतभेद करणारा, देशभक्त, अशी त्यांना विशेषणे आहेत; परंतु त्यांना शोभून दिसणारे विशेषण, म्हणजे ‘हिंदुत्व योद्धा’ असे आहे. केवळ हत्यारे वापरून युद्ध करणारा हा योद्धा नव्हे, तर हा शब्दांचा वापर करणारा आणि समाजात जागृती निर्माण करणारा योद्धा आहे. त्यांच्या जीवनाच्या कथेतून संस्कृती आणि हक्क यांसाठी उभे रहाणे, हे केवळ कारण किंवा सभ्यतेपोटी होत नाही. एखादा हिंदुत्वाच्या वारशाविषयी कसा अभिमानी असू शकतो, तसेच विश्वबंधुत्व असणारा, तर्कशुद्ध आणि सर्वसमावेशक असू शकतो, याचे त्यांनी उदाहरण घालून दिले आहे. भीतीदायक आणि डगमगणार्या आवाजांच्या काळात डॉ. रंगनाथन् यांची स्पष्टता अन् धैर्य यांमुळे अनेकांच्या मनात आग पेटवली आहे. यातून ते ‘नॅरेटिव्ह’ (कथानके) विषयी प्रश्न विचारणे, समानतेसाठी मागणी करणे आणि सत्यासाठी घाबरून जाऊ नये याविषयी अनेकांना आवाहन करतात. ते लिहितात, शिकवतात आणि विचार व्यक्त करतात यांमुळे त्यांचा प्रभाव वाढत आहे अन् भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील एक बुद्धीमान व्यक्ती म्हणून वारसा ते प्रस्थापित करत आहेत.

आनंद रंगनाथन् यांना निश्चिती आहे की, त्यांनी समोर आणलेले प्रश्न दुर्लक्षित करून चालणार नाहीत आणि हे करतांना त्यांनी भारताच्या आत्म्याचे संरक्षण करणार्या आधुनिक योद्ध्यांमध्ये मानाचे स्थान मिळवले आहे !



Abu Azmi : (म्हणे) ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ या सर्व मूर्खपणाच्या गोष्टी !
Islam Friendly Gym : केरळम्मध्ये ‘इस्लाम फ्रेंडली’ व्यायामशाळेवरून वाद
Firhad Hakim : कोलकात्यातील तृणमूल काँग्रेसचे महापौर फिरहाद हकीम यांचे त्यागपत्र
Bhopal University Renaming : बरकतउल्ला विद्यापिठाचे नाव ‘वाग्देवी भोजपाल विद्यापीठ’ होणार !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !