१. जोपर्यंत मनुष्य जगाकडून अपेक्षा करतो, तोपर्यंत तो कधीच सुखी होऊ शकत नाही; कारण जग हे अनित्य आणि क्षणभंगूर आहे. अशा जगाकडून जे मिळते, त्याचा वियोग निश्चित आहे.
२. जेव्हा आपल्याला स्वतःच्या चुकीविषयी अंतःकरणापासून खंत वाटते आणि आपली चुकीच्या कर्मातून मिळणार्या सुखाची लालसा नष्ट होते, तेव्हा आपल्याकडून तशी चूक पुन्हा होत नाही.
संदर्भ – ब्रह्मलीन श्रद्धेय स्वामी श्रीशरणानंदजी महाराज यांच्या प्रवचनातून संकलित (साभार : मासिक ‘कल्याण’, फेब्रुवारी २०२२)