
‘यमेवैष वृणुते तेन लभ्यः ।’ (कठोपनिषद्, अध्याय १, वल्ली २, वाक्य २३), म्हणजे ‘तो परमात्मा ज्याच्यावर कृपा करतो, त्यालाच त्याची प्राप्ती होते.’ ज्यांच्यावर तुझी कृपा होते, त्यालाच ते अमृत लाभते. भगवंताची कृपा, प्रसाद आणि करुणा यांविषयीची ग्वाही ज्यांना हे अमृत लाभले त्यांची आहे. ‘स्वतः आचरणात आणलेली साधना, तप, योग आणि कष्ट इत्यादींमुळे ‘भगवान लाभला’, असा त्यांचा दावा नाही, तर तो ‘केवळ भगवंताची करुणा, कृपाप्रसाद यांमुळे लाभला, अशी सगळ्यांची साक्ष आहे’, असे भक्त प्रल्हाद, पराशरऋषि, नारद महर्षि, महर्षि व्यास आणि भक्त पुंडलिक सांगतात, तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, समर्थ रामदासस्वामी, संत एकनाथ अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे सगळेच संत सांगतात.’
– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०२४)