‘छत्रपती संभाजी महाराज यांना शत्रूमुळे अंतकाळी तीव्र शारीरिक त्रास सहन करावा लागणे’, या प्रसंगाचे केलेले आध्यात्मिक विश्‍लेषण !

‘सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. याविषयी काहींच्या मनात पुढील प्रश्‍न आहेत, ‘छत्रपती संभाजी महाराज यांना अंतकाळी तीव्र शारीरिक यातना का सहन कराव्या लागल्या ? यातून त्यांना आध्यात्मिक लाभ काय झाला ? त्यांना शत्रूच्या तावडीतून सुटण्यासाठी देवाचे साहाय्य का मिळाले नाही ?’ त्याविषयी देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे.

१. छत्रपती संभाजी महाराज यांना शत्रूच्या तावडीत तीव्र शारीरिक यातना भोगाव्या लागण्याचे आध्यात्मिक कारण : प्रजेच्या हातून घडलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्मांमुळे त्या राज्याचे प्रारब्ध निर्माण होते. प्रजा साधना आणि धर्म यांपासून दूर जाते. त्याचे पाप काही अंशी त्या राज्याच्या राजाला भोगावे लागते. ‘छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य आणि धर्म यांसाठी अंतकाळी तीव्र शारीरिक यातना भोगाव्या लागणे’, हे त्यांचे समष्टी प्रारब्ध होते.

श्री. राम होनप

२. छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी सर्वस्वाचा त्याग केल्यामुळे झालेला आध्यात्मिक लाभ : छत्रपती संभाजी महाराज शत्रूच्या तावडीत सापडण्यापूर्वी त्यांची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती. शत्रूच्या तावडीत सापडल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी अनेक दिवस शत्रूकडून पुष्कळ शारीरिक यातना सहन केल्या. हा त्याग त्यांनी ‘स्वराज्य आणि धर्म’ यांसाठी केला होता. या त्यागामुळे काही दिवसांतच त्यांची आध्यात्मिक प्रगती होऊन मृत्यूपूर्वी त्यांची आध्यात्मिक पातळी ५९ टक्के झाली. (साधकाची १ वर्षात सरासरी १ – २ टक्के आध्यात्मिक पातळी वाढत असते.) मृत्यूनंतर त्यांना पुढील गती चांगली मिळाली.

३. राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी ईश्‍वरी अधिष्ठान आवश्यक असणे : राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करतांना अनेक स्थूल आणि सूक्ष्म अडथळे येतात. त्यातून बाहेर पडण्यासाठी साधकाची स्वतःची साधना आणि त्याला गुरूंचे पाठबळ असणे आवश्यक असते. त्यामुळे साधकाला सुरक्षितपणे राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करता येऊन त्यात यश प्राप्त होते.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.३.२०२५)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.