
१. ‘एकदा मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातून सांगोला (जिल्हा सोलापूर) येथे माझ्या घरी जात होतो. तेव्हा माझ्या मनात मायेतील विचार येत होते. त्यामुळे मी एक व्यावहारिक ध्येय गाठण्याच्या संदर्भात ठरवत होतो. त्या वेळी मला मायेतील विचारांतून बाहेर पडणे जमत नव्हते. काही घंट्यांनंतर माझ्या मनात विचार आला, ‘गुरुदेवांनी ‘ईश्वरप्राप्ती’ हे सर्वोच्च ध्येय माझ्या समोर ठेवले असतांना मी मायेतील ध्येयाचा विचार का करत आहे ? मला ईश्वरप्राप्तीच्या ध्येयासाठीच प्रयत्नरत रहायचे आहे.’ हे विचार माझ्या मनात चालू असतांना रामनाथी आश्रमातील प्रसादाच्या संदर्भात सेवा करणार्या एका साधिकेचा मला भ्रमणभाष आला. ती मला म्हणाली, ‘‘दीप, तू लिहिलेला एक लेख गुरुदेवांना आवडला आहे; म्हणून त्यांनी तुला प्रसाद द्यायला सांगितला आहे.’’ हे ऐकून माझे अंतःकरण भरून आले आणि ‘मी कुठेही असलो, तरी गुरुदेवांचे माझ्या मनातील प्रत्येक विचारावर लक्ष असते’, याची मला अनुभूती आली.
२. दुसर्या दिवशी माझ्या मनात पू. पृथ्वीराज हजारेकाका (सनातनचे २५ वे संत, वय ६५ वर्षे) यांच्या समवेत घालवलेल्या काही क्षणांच्या संदर्भात विचार चालू होते. त्या वेळी मला पू. हजारेकाकांचा भ्रमणभाष आला. ‘देवाला माझ्या मनातील प्रत्येक विचार कळतो अन् तो त्याची प्रचीतीही देतो’, असे मला जाणवले. यावरून गुरुदेवांची महानता पुन्हा एकदा माझ्या मनावर कोरली गेली आणि माझ्याकडून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
– श्री. दीप संतोष पाटणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.१२.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |