![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2025/01/29212524/alok-kumar.jpg)
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – महाकुंभमेळ्यात झालेली चेंगराचेंगरीची घटना अत्यंत दु:खद आणि वेदनादायक आहे. यात मृत पावलेल्या दिव्यात्मांच्या कुटुंबियांप्रती आम्ही गंभीर संवेदना प्रकट करतो. यात प्रशासकीय व्यवस्थेकडून काही न्यून राहिले असेल, तर ते सुव्यवस्थित करण्याची आम्ही स्थानिक शासन-प्रशासनाकडून अपेक्षा करतो. आम्ही यासंदर्भात प्रार्थना करतो की, ही वेळ कोणताही राजकीय दोषारोप करण्याची नाही, तर घायाळांना योग्य उपचार, मृतकांच्या कुटुंबियांना सांभाळणे आणि स्थितीवर नियंत्रण आणणे याची आहे. विश्व हिंदु परिषदसुद्धा या संबंधी आपली सर्व कर्तव्ये पूर्ण रूपाने पालन करील, अशी भूमिका विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री. आलोक कुमार यांनी मांडली. विहिंपने ‘एक्स’ खात्यावरून याची माहिती दिली.