श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्संगाचे सनातनचे सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

२१ जानेवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघी आल्यावर काय जाणवले ?’, ते पाहिले. आता या भागात ‘त्या दोघींची एकरूपता कशी आहे ?’, याविषयीचा काही सूत्रे पहाणार आहोत.

(भाग २)

आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/875797.html

डावीकडे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याशी संवाद साधतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (वर्ष २०२२)

६. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ सगुणातून वेगवेगळ्या दिसत असल्या, तरी अंतरातून एकच असणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ या दोघी निर्गुण-सगुण स्थितीत आल्यावर संतसत्संग चालू झाला. हा संतसत्संग चालू असतांना मला सूक्ष्मातून ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ या दोघींनी श्वेत साडी परिधान केली असून स्वर्णिम मुकुट घातलेला आहे’, अशा रूपात दिसल्या. मला त्यांच्या चेहर्‍याभोवती पांढर्‍या रंगाचे मोठे वलय दिसत होते. या संदर्भात ईश्वराने मला सांगितले, ‘हरि (श्रीविष्णु) आणि हर (शिव) यांच्यात सगुण स्तरावर पुष्कळ भेद आहे; पण अंतरातून म्हणजे निर्गुण स्तरावर ते एकच आहेत, तसेच श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या संदर्भात आहे. त्या सगुणातून वेगवेगळ्या दिसत असल्या, तरी अंतरातून एकच आहेत.’

श्री. निषाद देशमुख

६ अ.  सूक्ष्मातून श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या ठिकाणी ‘मोक्षदायिनी गंगे’चे, तर श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या ठिकाणी ‘ज्ञानदायिनी गंगे’चे रूप दिसणे : हरि आणि हर यांच्यामध्ये एक दिव्य घटक समान आहे आणि तो म्हणजे दोघांपाशी गंगा आहेत. (गंगा श्री विष्णूच्या चरणांतून निघून पृथ्वीवर आली, तेव्हा तिचा प्रचंड वेग न्यून करण्यासाठी शिवाने तिला त्याच्या जटेत धारण केले.) सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणजे भूलोकात वास करणारे श्रीमन्नारायण ! अशा श्रीमन्नारायणाचे चरण, म्हणजे रामनाथी येथील सनातनचा आश्रम असून या आश्रमात समष्टीसाठी प्रगटलेली पापहारिणी आणि मोक्षदायिनी गंगा म्हणजे श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ ! याच प्रकारे शिवस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जटेत वास करणारी आणि सर्वत्र आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करणारी ‘ज्ञानगंगा’ म्हणजे श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ !

६ आ. संतांचे महत्त्व संतच जाणू शकतात, तसे ‘पापहारिणी आणि मोक्षदायिनी गंगा’ म्हणजे श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे महत्त्व ‘ज्ञानगंगा’ म्हणजे श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ याच सांगू शकणे : मायेच्या विश्वात एक आधुनिक वैद्य दुसर्‍या आधुनिक वैद्याची भाषा आणि परिस्थिती समजू शकतो, तसेच अध्यात्मात एक संतच दुसर्‍या संतांची गुणवैशिष्ट्ये किंवा त्यांचे आध्यात्मिक चरित्र सांगू शकतो. संतांहून अल्प आध्यात्मिक पातळीच्या जिवाने लिहिलेले संतांचे चरित्र आध्यात्मिक स्तरावरील नसून त्यातील काही भाग मानसिक स्तरावरील असतो. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ या अध्यात्मातील उच्चपदावर विराजमान आहेत. त्यांचे महत्त्व समष्टीला सांगण्यासाठी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ याच आवश्यक आहेत. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे महत्त्व केवळ शब्दांतून नव्हे, तर अनुभूतींतूनही समष्टीला कळावे’, यासाठी ईश्वराने पापहारिणी आणि मोक्षदायिनी असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या आध्यात्मिक गुणांचे अध्यात्मशास्त्रासह विश्लेषण करण्यासाठी ‘ज्ञानगंगा’ म्हणजे श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे नियोजन केले. थोडक्यात या सत्संगाच्या माध्यमातून ईश्वराने ज्ञानगंगेने मोक्षदायिनी गंगेचे महत्त्व सांगण्यासाठी ‘न भूतो न भविष्यति’ असा दिव्य सत्संग साधकांना प्रदान केला.

७. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याशी केलेल्या वार्तालापाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

७ अ. ‘गुरु-शिष्य नाही भेदाभेद’ याची प्रचीती देणारा श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा सत्संग : या संतसत्संगात श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना विविध प्रश्न विचारून त्यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ या दोघी शिष्य आणि गुरु या दोन्ही स्थितीत एकाच वेळी असायच्या. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी शिष्यभावाने प्रश्न विचारल्यावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यातील गुरुतत्त्व जागृत होऊन त्यांच्याकडून समष्टीसाठी मार्गदर्शक असे सूत्र सांगितले जायचे, उदा. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सांगितले, ‘‘शिष्यत्व (शिष्य होणे) म्हणजे गुरूंवर आपली श्रद्धा अधिकाधिक दृढ करत जाणे.’’

याउलट जेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ शिष्य म्हणून त्यांची साधनायात्रा सांगायच्या, तेव्हा श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यातील गुरुतत्त्व जागृत होऊन त्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या आध्यात्मिक स्थितीचे विश्लेषण करायच्या, उदा. साधना चालू केल्यावर काही काळ श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना आध्यात्मिक त्रास अल्प करण्यासाठी नामजपादी उपाय करावे लागायचे. काही काळाने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना सांगितले, ‘‘सेवेतून आध्यात्मिक त्रास अल्प होत आहे.’’ हा प्रसंग श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सांगितल्यावर श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ म्हणाल्या, ‘‘यातून आपण श्री गुरूंना शरण गेल्यावर ते आपल्याला प्रत्येक अडचणीतून सोडवून आपली काळजी कशी घेतात ?’, हे शिकायला मिळते.’’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संकलित केलेल्या ‘गुरुकृपायोग’ या ग्रंथात एक सूत्र आहे, ‘अध्यात्मात १ (गुरु) + १ (शिष्य) = १ असतात; कारण शेवटी शिष्य गुरूंशी एकरूप होतो. त्यांच्यात अद्वैत रहात नाही.’ याच प्रकारे समष्टी संतांमध्येही ‘गुरु-शिष्य नाही भेदाभेद’ म्हणजे शिष्य आणि गुरु असा भेद रहात नाही. (समष्टी संत शिष्य म्हणून अध्यात्मातील तत्त्व अनुभवतात आणि गुरुस्वरूप होऊन त्यांचे ज्ञान समष्टीला देतात.) या तत्त्वाची प्रचीती श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याशी साधलेल्या संवादातून आली. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ दोन्ही समष्टी संत असल्याने त्यांच्यात ईश्वरेच्छेनुसार आणि कार्यानुरूप शिष्य किंवा गुरु यांची स्थिती निर्माण होत होती.

(‘वरील परिच्छेद लिहितांना मी हवेत उंच उंच तरंगत आहे’, असे जाणवून माझ्या मनाला आनंद होत होता.’ – श्री. निषाद)

७ आ. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याशी साधलेल्या संवादातून भाव, आनंद आणि शांती यांची स्पंदने प्रक्षेपित होणे : श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याशी साधलेल्या या भावसंवादाचे अन्य एक वैशिष्ट्य, म्हणजे हा संवाद चालू असतांना भाव, आनंद आणि शांती यांच्या स्पंदनांचे प्रमाण सतत ८० टक्क्यांहून अधिक होते. हा संवाद एकदाही मानसिक किंवा शक्तीच्या स्तराकडे न जाता सतत आध्यात्मिक स्तरावर झाला.

७ इ. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ या श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याशी संवाद साधतांना सूक्ष्मातून ‘हरि ॐ तत्सत्’ असा नाद ऐकू येणे : श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ या श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याशी वार्तालाप करत असतांना मला सूक्ष्मातून पुष्कळ वेळ ‘हरि ॐ तत्सत्’ असा नाद (नामजप) ऐकू येत होता. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांची उच्च आध्यात्मिक स्थिती होती. त्यामुळे प.पू. भक्तराज महाराज यांच्या गुरूंनी त्यांना निर्गुणाशी निगडित ‘हरि ॐ तत्सत्’ असा नामजप दिला होता. या नामजपाच्या माध्यमातून प.पू. भक्तराज महाराज यांची आध्यात्मिक स्थितीही काही प्रमाणात लक्षात येते. प.पू. भक्तराज महाराज यांच्याप्रमाणे श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची आध्यात्मिक स्थितीही पुष्कळ उच्च आहे आणि या वार्तालापातून श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ तिचे प्रगटीकरण करत होत्या. त्यामुळे ‘मला सूक्ष्मातून ‘हरि ॐ तत्सत्’ असा नामजप ऐकू येत आहे’, असे मला वाटले.’

(क्रमश:)

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.९.२०२२, संध्याकाळी ५.४०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/878389.html