होय, आम्ही (काँग्रेसवाले) अल्पसंख्यांकांच्या बाजूनेच आहोत! – कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्‍वर

कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्‍वर

हासन (कर्नाटक) – होय, आम्ही अल्पसंख्यांकांच्या बाजूनेच आहोत आणि यात लपवण्यासारखे काहीही नाही, असे विधान कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्‍वर यांनी काँग्रेसच्या एका सभेत केले. या सभेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते.

गृहमंत्री परमेश्‍वर म्हणाले की, ‘वक्फ’साठी सहस्रो कोटी रुपयांची भूमी भाजपच्या काळात अधिसूचित करण्यात आली होती; मात्र आता काँग्रेसवर शेतकर्‍यांची भूमी बळकावल्याचा आरोप होत आहे. अल्पसंख्यांकसुद्धा याच देशात जन्मलेले, येथेच वाढलेले आणि येथेच मरण पावणारे आहेत. त्यांचाही या देशावर हक्क आहे. अशा परिस्थितीत त्यांना लाभ मिळवून देणे हे आमचे आद्य कर्तव्य आह. (‘भारताच्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे’, असे म्हणणार्‍या काँग्रेसवाल्यांकडून वेगळी अपेक्षा काय करणार ? – संपादक)