१ सहस्रहून अधिक हिंदू सहभागी
चेन्नई – बांगलादेशातील हिंदूंवरील अत्यचाराच्या निषेधार्थ ‘बांगलादेशातील हिंदूंच्या हक्कांसाठी बचाव पथका’च्या वतीने ४ डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय स्तरावर आंदोलन आयोजित करण्यात आले. एकाच वेळी सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी हे आंदोलन आयोजित करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून चेन्नईच्या राजारत्नम मैदानाच्या जवळ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध हिंदु संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी बांगलादेशातील हिंदूंच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. भाजप आणि इतर काही राजकीय पक्ष यांचे नेतेही या आंदोलनात सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी तेथे उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. चेन्नई येथील या आंदोलनात १ सहस्रहून अधिक हिंदुत्ववादी आणि हिंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते. आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता. त्यांनी आंदोलकांना कह्यात घेतले. या आंदोलनात भाजपच्या नगरसेविका श्रीमती उमा आनंदन्, भाजपच्या कामगार कल्याण विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री. राधाकृष्णन्, हिंदु जनजागृती समितीच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् , सौ. सुगंधी जयकुमार आणि श्री. जयकुमार सहभागी झाले होते.
भारत सरकारने कठोर कारवाई करावी ! – पू. (सौ.) उमा रविचंद्रन्
या प्रसंगी पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या दयनीय परिस्थितीविषयी ‘नराधर’ या सामाजिक माध्यमातील वृत्तवाहिनीला मुलाखात दिली. ‘बांगलादेशातील हिंदूंचे जीवन आणि मालमत्ता यांचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारने कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे’, असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले.