गुरुदेवा, भवसागरी या ।
मुक्तीचा किनारा तुम्ही ।
अंधार्या मार्गी या ।
साधनेचा प्रकाश तुम्ही ॥ १ ॥
खडतर आयुष्यात आमुच्या ।
आशेचा किरण तुम्ही ।
अज्ञानी साधका या ।
ज्ञानाचा दीप तुम्ही ॥ २ ॥
मातीचा गोळा आम्ही ।
घडविता आकार देऊन तुम्ही ।
अडखळतोे बालक आम्ही ।
बोट धरून चालवता गुरुदेव तुम्ही ॥ ३ ॥
मायेत भरकटतो आम्ही ।
नेणारे मोक्षधामा तुम्ही ।
पामर भक्त आम्ही ।
साक्षात परब्रह्म तुम्ही ॥ ४ ॥
आळवतो आम्ही गुरुराया ।
प्रगतीचा मज प्रसाद द्यावा ।
गुरुचरणी जाण्याचा योग जुळावा ।
सुवर्णमय जन्म व्हावा ॥ ५ ॥
– कु. प्रियांका शिंदे (वय २१ वर्षे), गाजरवाडी, निफाड, नाशिक. (१५.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |