सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे  यांच्‍याकडून साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमातील साधकांच्‍या व्‍यष्‍टी साधनेचा आढावा घेतात. त्‍या वेळी साधकांना त्‍यांच्‍याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे

१. सौ. अंजली झरकर

१ अ. स्‍वप्‍नाच्‍या माध्‍यमातून शिकवणे : ‘एकदा मला ‘आश्रमातील एका सेवेसाठी साहाय्‍य कराल का ?’, असे विचारले होते. त्‍या वेळी मला थोडा शारीरिक आणि मानसिक त्रास होत होता; म्‍हणून मी शारीरिक त्रासाचे कारण सांगून साहाय्‍य करण्‍यास नकार दिला.

त्‍या रात्री माझ्‍या स्‍वप्‍नात सद़्‍गुरु दादा येऊन ते मला म्‍हणाले, ‘गुरुदेवांच्‍या सेवेला कधीच ‘नाही’ म्‍हणायचे नसते. तुम्‍ही लगेच ‘हो’ म्‍हणाला असता, तर गुरुदेवांच्‍या कृपेने तुमचा शारीरिक आणि मानसिक त्रास अल्‍प झाला असता. गुरुकृपेने मिळालेली सेवेची संधी कधी चुकवायची नाही.’ सद़्‍गुरु दादांचे हे वाक्‍य ऐकून मला माझ्‍या चुकीची जाणीव झाली. माझ्‍या स्‍वभावदोषांमुळे माझी साधनेची हानी होऊ नये; म्‍हणून गुरुदेवांनीच माझी चूक दाखवली. याबद्दल माझ्‍याकडून कृतज्ञता व्‍यक्‍त झाली.’

२. कु. मनीषा शिंदे

२ अ. सद़्‍गुरु दादांना केवळ पाहिल्‍यावर साधिकेच्‍या अंतर्मनातील चैतन्‍य कार्यरत होऊन उत्‍साह वाढणे : ‘सद़्‍गुरु दादा म्‍हणजे प्रीतीचा झरा ! आध्‍यात्मिक त्रास होत असतांना मी केवळ त्‍यांच्‍या समोर बसले, तरी माझा त्रास उणावून मला चांगले वाटू लागते. त्‍यांना केवळ पाहिल्‍यावर ‘माझ्‍या अंतर्मनातील चैतन्‍य कार्यरत होते आणि माझा उत्‍साह वाढतो’, असे मला जाणवते.’

३. श्री. दीपक गोडसे 

अ. ‘सद़्‍गुरु दादांच्‍या खोलीपासून काही अंतरावर असतांनाच मला दैवी सुगंध येतो.’

सर्व सूत्रांसाठी दिनांक (२३.८.२०२४)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक