सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी काव्य – ‘१४ विद्या आणि ६४ कला यांचे पुनरुज्जीवन’
१४ विद्या अन् ६४ कला लुप्त झाल्या या अवनी ।
करण्या तयांचे पुनरुज्जीवन ज्ञान तयांचे सत्वर घेऊनी (टीप) ।। १ ।।
संगीत नि कला विभाग स्थापूनी ।
साधकांकडूनी संशोधन करवूनी ।। २ ।।
अनेक संत-महंतांचे मार्गदर्शन घेऊनी ।
साधकां कलांमध्ये पारंगत करी ।। ३ ।।
कला नसे केवळ मनोरंजनाचे साधन ।
ईश्वरप्राप्तीचे ते एक माध्यम ।। ४ ।।
महत्त्व ते समाजावर बिंबविण्या ।
बोलवी कलाकार आविष्कार दाखविण्या ।। ५ ।।
प्रयोग करवूनी दिशा दाखवूनी ।
दृष्टी बदलूनी करिती तया आनंदी ।। ६ ।।
व्यासपिठांचा उपयोग करूनी ।
लेख-संशोधने विश्वा दाखवी ।। ७ ।।
भारतीय संस्कृतीचे महत्त्व बिंबविण्या ।
१४ विद्या ६४ कलांचे पुनरुज्जीवन करती ।। ८ ।।
आहे का हो या भूवरी अशी विभूती एकतरी ।
धर्म स्थापण्या भूवरी एवढे सर्व अथक करती ।। ९ ।।
अल्प जरी माझी मती प्रयत्न जरी खारीपरी ।
प्रेरणा गुरुदेवच देत असे वर्णाया महती तयांची ।। १० ।।
इदं न मम ।
सच्चिदानंद परब्रह्म गुरु चरणार्पणमस्तु ।
टीप – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ईश्वरी ज्ञान प्राप्त करणार्या साधकांना अनेक प्रश्न विचारून १४ विद्या आणि ६४ कलांविषयी सखोल ज्ञान प्राप्त केले आहे.
– सद्गुरु राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.७.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |