उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. ऋत्वी सणस ही या पिढीतील एक आहे !
(वर्ष २०२४ मध्ये कु. ऋत्वी विकास सणस (वय ५ वर्षे) हिची आध्यात्मिक पातळी ५४ टक्के आहे. – संकलक)
कु. ऋत्वी सणस हिला ५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
उद्या १७.११.२०२४ (कार्तिक कृष्ण द्वितीया) या दिवशी कु. ऋत्वी विकास सणस हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईने लिहून दिलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. भाव
‘कु. ऋत्वीमध्ये देवाप्रती पुष्कळ भाव आहे. ती स्वतःच बर्याच वेळा देवाचे नाव घेते. ‘‘देव आपल्याला साहाय्य करतो. ‘देव माझ्या समवेत आहे; म्हणून मी पडली, तरी मला लागलं नाही’’, असे ती म्हणते. रुग्णाईत असल्यास ती ‘‘देव मला लवकर बरं करतो’’, असे म्हणते. ती काही चांगले झाले, तर लगेच ‘देवाने केले’, असे म्हणून जणू कृतज्ञता व्यक्त करत असते. ‘‘मला देवाने पुष्कळ चांगली आई, वडील, बहीण, मावशी आणि इतर नातेवाईक दिले’’, असे ती स्वतःच म्हणत असते. ‘तिच्याकडील सगळे तिला देवाने दिले आहे’, असा तिचा भाव असतो आणि ‘त्याबद्दल ती कृतज्ञ आहे’, असे मला जाणवते. ‘ती सतत ईश्वराच्या सान्निध्यात आहे’, असे मला जाणवते.
२. आनंदी आणि उत्साही
तिला सगळ्यांना आनंदी पहायचे असते. ती सतत आनंदी, उत्साही आणि हसतमुख असते.
३. क्षमायाचना
तिच्याकडून चूक झाली, तर लगेच क्षमा मागून चूक दुरुस्त करते.
४. निरीक्षणक्षमता
तिची निरीक्षणक्षमता चांगली आहे. ती बहुतेक गोष्टी बघून शिकते.
५. समंजसपणा
माझ्या चेहर्यावरून तिला ‘माझी मानसिक स्थिती कशी आहे ?’, हे लगेच कळते. माझी मनःस्थिती चांगली नसेल, तर ती चांगली करण्याचा प्रयत्न करते आणि मला हसायला भाग पाडते.
– सौ. ऋतुजा विकास सणस (कु. ऋत्वीची आई), मुंबई. (२९.४.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |