पंचतत्त्वे’ या शब्दाऐवजी ‘पंचमहाभूते’ हा शब्द प्रचलित कसा झाला ?’, याविषयी देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे.
१. ऋषींना प्रथम ‘पृथ्वी’ आणि त्यानंतर ‘ब्रह्मांड’ यांचे कार्य पंचतत्त्वांद्वारे होत असल्याचे ईश्वरी ज्ञानाद्वारे समजणे
ऋषींनी ईश्वरी ज्ञानाद्वारे ‘पृथ्वीची निर्मिती आणि तिचे कार्य’ यांचा अभ्यास केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले, ‘पृथ्वीची निर्मिती आणि तिचे कार्य पंचतत्त्वांद्वारे चालू असते.’ त्यानंतर ऋषींनी ईश्वरी ज्ञानाद्वारे ब्रह्मांडाची व्याप्ती समजून घेतली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले, ‘ब्रह्मांडात असंख्य ईश्वरी तत्त्वे आहेत; परंतु ब्रह्मांडाचे प्रधान कार्य पंचतत्त्वांद्वारे चालते.’ यांतून त्या ऋषींना पंचतत्त्वांच्या कार्याची व्याप्ती लक्षात आली आणि त्यांनी पाच तत्त्वांना ‘पंचमहाभूते’, असे म्हणण्यास प्रारंभ केला.
२. ‘पंचमहाभूते’, या शब्दाचा अर्थ
‘पंच’ या शब्दाचा अर्थ ‘पाच तत्त्वे’ आणि ‘महा’ या शब्दाचा अर्थ ‘उच्च’, असा आहे. ‘भू’ या शब्दाचा अर्थ ‘सर्वत्र व्याप्त’, असा आहे. ‘ते’ हा शब्द अनंत काळाशी संबंधित आहे.
‘उच्च स्वरूपाची पाच तत्त्वे अनंत काळापासून सर्वत्र व्याप्त आहेत; म्हणून ऋषींनी त्यांना ‘पंचमहाभूते’, ही संज्ञा दिली.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.२.२०२४)
|