रायगड (छत्तीसगड) – येथे धर्मांतराच्या कारवाया केल्याच्या संदर्भात आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी चालू आहे. येथील जुटमील परिसरातील काशीराम चौकाजवळ असलेल्या शाऊल नागाच्या घरी प्रार्थना सभेच्या नावाखाली धर्मांतराचा प्रकार चालू होता. या बैठकीला १०० हून अधिक लोक उपस्थित होते.
विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांना माहिती मिळाली, तेव्हा त्यांचे कार्यकर्ते तेथे पोचले आणि त्यांनी आक्षेप घेतला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शाऊल आणि इंद्रजीत खरे यांना अटक केली. बजरंग दलाचे म्हणणे आहे की, गरीब लोकांना आमिष दाखवून धर्मांतरित केले जात आहे. गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार, येथे आठवड्यातून ४ दिवस प्रार्थना सभा आयोजित केली जाते. येथे दूरदूरवरून लोक येतात.
संपादकीय भूमिकादेशात कठोर धर्मांतरविरोधी कायदा नसल्याचाच हा परिणाम आहे ! देशात धर्मांतर रोखण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे ! |