बंदुकीचा धाक दाखवून फोडली दानपेटी

चंद्रपूर – येथील दाताळा मार्गावरील प्रसिद्ध श्री तिरुपती बालाजी मंदिरात ११ जानेवारीच्या रात्री १ वाजताच्या सुमारास ७ बंदूकधार्यांनी दरोडा घातला. मंदिरात असलेल्या चौकीदाराचे हात-पाय बांधून आणि त्याला बंदुकीचा धाक दाखवून एका खोलीत बंद केले. दानपेटी फोडून लाखोची रक्कम पळवली. या प्रकरणी १२ जानेवारी या दिवशी सकाळी गुन्हा नोंद झाला आहे.
१. दरोडेखोरांनी मंदिरात प्रवेश करताच सीसीटीव्ही कॅमेर्यावर कापड टाकले. त्यामुळे कोणताही चोरटा त्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला नाही. चौकीदारांकडील ३ सहस्र रुपये, तसेच त्याने कुणाला संपर्क करू नये; म्हणून भ्रमणभाषही चोरट्यांनी पळवला.
२. दाताळा मार्गावर ईरइ नदीच्या काठावर तिरुपती बालाजीचे मंदिर आहे. ११ जानेवारीच्या रात्री उशिरा एक माणूस मंदिरात आला. त्याने मंदिराचे संपूर्ण निरीक्षण केले. गाभार्यात पहाणी करून तो निघून गेला.
३. त्यानंतर मध्यरात्री १ वाजता ७ सशस्त्र दरोडेखोरांनी मंदिरात प्रवेश केला. दानपेटी फोडल्यानंतर सातही चोरट्यांनी तिरुपती बालाजी यांची मूर्ती असलेल्या मंदिराचे दरवाजे, तसेच लगतच्या मंदिराचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचे कुलूप न तुटल्यामुळे चोरटे निघून गेले.
संपादकीय भूमिकाहिंदूंची मंदिरे असुरक्षित ! |