आज भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे पथक बुलढाणा येथे येणार !

बुलढाणा येथे केसगळती

बुलढाणा – शेगाव तालुक्यात केस गळण्याची समस्या तीव्र झाली आहे. पाणी किंवा कुठलाही संसर्ग यांमुळे असे झालेले नसल्याचे प्रयोगशाळेतील अहवालानंतर उघडकीस आले आहे. असा प्रकार होण्यात १३९ हून अधिक पीडितांचा समावेश आहे. या ग्रामस्थांना आणि केस गळतीमागील नेमके कारण शोधण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे पथक देहलीतून १३ जानेवारी या दिवशी बुलढाणा येथे येणार आहे.