(विद्युत् मूल्यमापक निरीक्षक म्हणजे मीटर निरीक्षक)
पिंपरी-चिंचवड (पुणे) – विकास गव्हाणे हे महापालिकेच्या सांगवी विभागीय कार्यालयात मीटर निरीक्षक म्हणून काम करत होते. पाणीपट्टी देयक अल्प करण्यासाठी त्यांनी १ सहस्र ६०० रुपये लाचेची मागणी केली. ही रक्कम त्यांनी कार्यालयात मानधन तत्त्वावर काम करणार्या संगणक हाताळणार्या महिला कर्मचार्याच्या वतीने स्वीकारली. गव्हाणे यांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गव्हाणे यांच्या विरोधात कारवाई केली आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी गव्हाणे यांना महापालिका सेवेतून निलंबित करत विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. आरोपी गव्हाणे हे सुटीवर असून परराज्यात गेल्याने त्यांना अटक केली नसल्याचे पोलिसांनी महापालिकेला कळवले.
संपादकीय भूमिकाअशांना लवकरात लवकर कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |