सातारा, १२ जानेवारी (वार्ता.) – येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाला माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अधिवक्ता आशिष शेलार यांनी भेट दिली. या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले उपस्थित होते.
आशिष शेलार म्हणाले, ‘‘मी प्रथमच सातारा जिल्ह्यात आलो आहे. वस्तूसंग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवलेल्या वाघनखांचे दर्शन घेतले. यातून मला प्रेरणा मिळाली. राज्यातील गड, दुर्गांना पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी आराखडा सिद्ध करण्यात आला आहे. गड-दुर्गांचे संवर्धन शासन करणार आहे.’’