
नगर – अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या मूळ गुरुपिठावरील परमसद्गुरु गजाजन महाराज यांच्या चैतन्य पादुकांचे आगमन १२ जानेवारी या दिवशी अहिल्यानगरमध्ये झाले. १३ ते १७ जानेवारी २०२५ या कालावधीत या पादुकांचे शहरातील विविध भागांतील भाविकांच्या निवासस्थानी पूजन करण्यात येईल. ज्या भाविकांना आपल्या निवासस्थानी पादुकांचे पूजन करण्याची इच्छा असेल त्यांनी श्री. अमित वाळिंबे यांच्याशी भ्रमणभाष क्रमांक ८८८८१ ५५०५५ वर संपर्क साधून नाव नोंदणी करावी.
१५ जानेवारीला सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत सिद्धी बागेतील महादेव मंदिराच्या प्रांगणात पादुका पूजनाचा सामुदायिक सोहळा होईल. ज्यांना आपल्या निवासस्थानी पादुकापूजन करण्याची इच्छा होती, ते येथे उपस्थित राहून पादुका पूजनासह दर्शनाचा लाभ घेऊ शकतील. अधिकाधिक भाविकांनी आपापल्या निवासस्थानी पादुका पूजनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सर्वश्री ल.य. कुवळेकर, सौ. ज्योती वाळिंबे आणि मिलिंद चवंडके यांनी केले.